Share

Rohit Pawar and Meghna Bordikar : माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला तर माय झ#$ टाकेन पोलिसांची, मेघना बोर्डीकरांच्या समोर खुलेआम धमकी, रोहित पवारांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Rohit Pawar and Meghna Bordikar:  परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नुकताच सोशल मीडियावर दोन व्हिडीओ शेअर करत राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पहिल्या व्हिडीओत व्यासपीठावरून एका व्यक्तीने पोलिसांबद्दल अयोग्य शब्द वापरत खुलेआम धमकी दिली, तर दुसऱ्या व्हिडीओत ग्रामसेवकाला उघडपणे धमकावल्याचा प्रकार उघड झाला आहे.

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याला दिलं प्रोत्साहन?

पहिल्या व्हिडीओत व्यासपीठावर मेघना बोर्डीकर उभ्या असताना एक व्यक्ती पोलिसांना उद्देशून म्हणतो – “माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला, तर माय झ#$ टाकेन पोलिसांची, लक्षात ठेवा.” त्यावेळी कार्यक्रमाला पोलीस उपस्थित असतानाही हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे, त्या वेळी मंत्री बोर्डीकर यांनी त्या व्यक्तीला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, उलट टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देताना दिसल्या.

ग्रामसेवकाला उघडपणे धमकी

दुसऱ्या व्हिडीओत बोरी गावात (Bori Village) झालेल्या कार्यक्रमाचा संदर्भ आहे. गर्दी कमी असल्यामुळे बोर्डीकर यांनी थेट ग्रामसेवकाला व्यासपीठासमोर बोलावून त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “असं काम केलं तर कानाखाली मारेन… चमचेगिरी केली तर बडतर्फ करेन… दुसऱ्याची हमाली करायची असेल तर नोकरी सोडून दे,” अशा थेट धमक्या ग्रामसेवकाला दिल्या गेल्याचे रोहित पवार यांनी आरोप केले.

राजकीय वातावरण तापले

या दोन्ही व्हिडीओंनी परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले आहे. रोहित पवार यांनी हे व्हिडीओ ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे की, राज्याच्या मंत्रीपदावर असलेली व्यक्ती अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तींच्या बाजूने उभी राहते का? आणि प्रशासनावरील दबाव टाकण्यासाठी अशा पद्धतीचा वापर योग्य आहे का?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now