कार्तिकीपूर्वी विठ्ठल मंदिर उघडले नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकू; वारकऱ्यांचा इशारा

मुंबई | येणाऱ्या कार्तिकी यात्रेच्यावेळी राज्य सरकारने समनव्ययाची भूमिका घेत एकादशीपूर्वी ताळेबंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर खुले करावे. तसेच संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे यात्रेचा सोहळा साजरा करण्यासाठी निर्विघ्नपणे परवानगी देण्यात यावी.

जर असे केले नाही तर मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे’ या संत वचनाप्रमाणे कठोर भूमिका घेत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा वारकरी संप्रदायाने राज्य सरकारला दिला.

आहेमहाराज मंडळींनी रविवारी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कार्तिकी वारीबाबत वारकरी संप्रदायाची भूमिका त्यांनी मांडली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने चार महिन्यांपूर्वी आषाढी यात्रेत अनेक निर्बंध लावण्यात आले.

तरीदेखील वारकरी संप्रदायाने हे निर्बंध पाळून प्रशासनाला सहकार्य केले होते. मात्र आता देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रसार कमी होत आहे आणि सरकार सर्व निर्बंध हटवत आहे. अनेक कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे.

सरकारने कार्तिकी यात्रेलादेखील परवानगी द्यावी आणि प्रत्येक मठात ५० वारकरी थांबण्याची परवानगी देण्यात यावी. सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत नगर प्रदक्षिणा मारण्याची परवानगी देण्यात यावी. जर मदत केली नाही तर येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा वारकरी संप्रदायाकांनी दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.