आरोग्य केंद्र बंद करून मंदिरं उघडू का? मुख्यमंत्र्यांचा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यासमोरच सवाल…

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. यामुळे राज्य सरकारवर सतत टीका केली जात आहे. यासाठी भाजपने राज्यभर आंदोलने देखील केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्याचे कारण सांगत ठाकरे सरकारने राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत.

यावरून मात्र सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर विरोधक टीका करत आहे. यामुळे हा वाद चांगलाच पेटला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच उत्तर दिले आहे. त्यांनी तिसऱ्या लाटेचा धोका आणि केंद्र सरकारने केलेली सूचना याचा दाखला दिला आहे.

एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी सगळी उत्तरे दिली आहेत.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील बंद पडलेले आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही.

कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

यावेळी भाजप नेते मात्र शांत बसले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर मुद्यावर त्यांनाच टोला लगावला आहे. यामुळे कार्यक्रमाची चर्चा सुरू होती. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ताज्या बातम्या

अजितदादांच्या कामांचा जगात डंका! कोरोना काळातील कामांमुळे सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्काराने गौरव

रवी शास्त्री, विराट कोहलीवर बीसीसीआय नाराज, कारवाई होण्याची शक्यता, काय आहे प्रकरण, वाचा..

साधा साप म्हणून तरुणाने घेतला नागाशी पंगा, त्यानंतर पहा काय झालं; समोर आला भयानक व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.