अरेरे! नवऱ्याला घोड्यावर चढता आलं नाही म्हणून नवरीने भर मंडपात दिला लग्नाला नकार

शाहजहांपूर। हल्ली कोण काय करेल याचा नेम नाही. अशातच सध्या सर्वांनाच एखाद्या गोष्टीवरून लगेच राग येतो. त्यामुळे कधी, कोण, कसं वागेल सांगता येत नाही. आणि असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. चक्क एका नवरीनं नवरदेवाला घोड्यावर चढता आला नाही म्हणून दारातूनच माघारी पाठवलं आहे व लग्न मोडलं आहे.

ज्या वेळी ही गोष्ट सर्वाना समजली त्या वेळी सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र नक्की नवरी अशी का वागली किंवा नेमकं प्रकरण काय आहे पाहुयात.

हा संपूर्ण प्रकार यूपीच्या शाहजहांपूर येथे एका लग्नात घडला आहे. गुरुवारी एका विवाह सोहळ्यादरम्यान नवऱ्यामुलाने इतके मद्यपान केले होते की, त्याला घोड़्यावर चढणे अशक्य झाले. बर्‍याचदा प्रयत्न करूनही जेव्हा त्याला घोड्यावर चढता आले नाही. तेव्हा मग नवरीने त्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला.

त्यानंतर नवरीने सांगितले की, जो व्यक्ती लग्नाच्या दिवशी इतकी दारू प्यायला आहे की, त्याला त्या नशेत घोड्यावर देखील चढता येत नाही. अशा माणसासोबत लग्न करुन मला माझे आयुष्य खराब नाही करायचे. त्यामुळे माझा या लग्नाला नकार आहे.

मात्र घडलेल्या प्रकारानंतर नवरीला दोघांच्या घरच्यांनी लग्न करण्यास तयार केलं. त्यांच्यात बातचीत झाली व अखेर नवरी लग्न करण्यास तयार झाली. त्यांनी सर्वांच्या समोर मंडपात हार घातले मात्र नवरीला ही गोष्ट खटकत असल्याने तिने शेवटी सात फेरे घेताना लग्न मोडले व या निर्णयाला तिच्या घरच्यांनी साथ दिली.

त्यानंतर हा प्रकार पोलीस ठाण्यात पोहचला पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे सामान परत केले. त्यानंतर वराला वधू शिवायच आपली वरात घरी न्यावी लागली. मात्र कोणीही एकमेकांवर गुन्हा दाखल केला नाही. व त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.