…म्हणून बायको ऐश्वर्याला ऑनस्क्रीन किस करत नाही अभिषेक बच्चन

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची जोडी खऱ्या आयुष्यासोबतच मोठ्या पडद्यावर देखील चांगलीच यशस्वी झाली होती. दोघांनी अनेक वेळा एकत्र चित्रपट केले. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत नसले तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्यांच्या जोडीला खुप पसंत केले जाते.

दोघेही बॉलीवूडमधले पावर कपल म्हणून ओळखले जातात. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असले तरी कोणत्याही चित्रपटात त्यांनी किसिंग दिला नाही. त्यांनी असे का केले? याबद्दल अखेर अभिषेकने खुलासा केला आहे.

अभिषेक ऐश्वर्यासोबत बाहेर देशात गेला होता त्यावेळी तिथे त्याला एका मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, ‘हॉलीवूडमध्ये किसिंग सीन खुप कॉमन आहेत. पण भारतात ते कॉमन नाहीत. म्हणून भवतेक आम्ही किसिंग सीन दिला नाही’.

फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोड्यांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या जोडीचा समावेश होतो. २००७ मध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर देखील दोघे आनंदाचे एकत्र राहत आहेत. ऐश्वर्या अभिषेकला आराध्या नावाची मुलगी आहे.

२००६ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी मीडियामध्ये अनेक बातम्या छापून आल्या होत्या. त्यातील सर्वात जास्त चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे ऐश्वर्याचा मंगल दोष. लग्नापूर्वी ऐश्वर्याबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.

चौदा वर्षे झाली तरी ऐश्वर्या अभिषेक सुखाने संसार करत आहेत. चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहीली भेट झाली तर ‘गुरु’ चित्रपटाच्या शुटींग वेळी दोघांच्या प्रेम कहानील सुरुवात झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अनेकदा दोघे वेगळे होत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्या बातम्या खोट्या ठरल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

विवाहीत व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी मधुबाला त्यांच्या मुलांचा आणि पत्नीचा खर्च उचलायला होत्या तयार

‘या’ बॉलीवूड कलाकारांच्या मुलांनी आत्तापर्यंत त्यांचे चित्रपट कधीच पाहिले नाहीत कारण…

विनोद खन्नासोबत रोमँटिक सीन द्यायला घाबरायच्या अभिनेत्री; कारण ऐकून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.