‘कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू जास्त उपयोगाचं नाही, तर…’

मुंबई : गेल्या वर्षीच्या मे महिन्यानंतर एवढ्या वेगाने पहिल्यांदाच कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे पाहता, वॅक्सिनेशन सुरू असतानाही संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक सिद्ध होऊ शकते, असे मानले जात आहे.

अशातच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं मुख्यमंत्री ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ )  रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.

कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण रविवारी रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यात लॉकडाऊनचा खरच कितपत फायदा आहे? याचे उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिले आहे. ते म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू आणि दोन दिवसाचं लॉकडाऊन जास्त उपयोगाचं नाही. त्यांचे असंही म्हणणे आहे, की लसीकरणामुळेच कोरोनाची दुसरी लाट थांबवता येऊ शकते.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून रोखू शकतो. मात्र, आठवड्याच्या शेवटी लावलं जाणार लॉकडाऊन तसेच नाईट कर्फ्यू याचा तितका फायदा होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या 

सावत्र मुलीसोबत दिसला दिया मिर्झाचा खास बॉन्ड, हनीमूनला मुलीसोबत केले फोटोशूट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला विरोध, हिंसक आंदोलनात ४ आदोलकांचा मृत्यू

….म्हणून राजेश खन्नाने मागितली होती अमिताभ बच्चनची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.