हे फक्त टाटाच करू शकतात, दुसरं कुणाचं काम नाही! पहा काय आहे खुशखबर..

मुंबई| भारतीय प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा हे त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे कायमच चर्चेत राहतात. त्यांच्या दर्यदिलीबद्दल संपूर्ण जगालाच माहिती आहे. यामुळेच कोट्यावधी भारतीय टाटांवरती प्रेम करतात. याचप्रमाने टाटा ही भारतीयांवर व भारतावर प्रेम करतात.

टाटा हे आपल्या कर्मचार्यांना स्वतःच्या कुटुंबाप्रमाने जपतात. यामुळेच कोरोना काळातही टाटा उद्योग समूहाने कर्माच्याऱ्यांना पगार तर दिलाच पण आता दिवाळीसाठी बोनस देखील जाहीर केला आहे. ‘देश का नमक टाटा नमक’ असे म्हणत नेटकऱ्यांनी टाटा यांचे कौतुकही केले होते.

कोरोना काळात रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल ताज देखील खुले केले होते. एवढेच नव्हे तर पंतप्रधान सहायता निधीसाठी १५०० कोटी रुपयांची मदत देखील जाहीर केली होती.

सोमवारी टाटा स्टीलने २३५.५४ कोटी रुपये कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे जाहीर केले आहे. हि रक्कम २४ हजार ७४ कर्मचारऱ्यांना मिळणार आहे. दिवाळीच्या सणानिमित्त ही भेट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ग्रेट रिव्हिजननुसार बेसिक डिए आणि १८ महिन्यातील अनुशेष यामुळे यावर्षी बोनसची रक्कम यावर्षी अधिक असेल.

कोरोनाकाळात लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. अनेक कर्मच्याऱ्यांना कामावरून घरी बसविण्यात आले. यामुळे टाटा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ज्या लोकांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कंपनीसाठी दिले अश्या लोकांना पाठिंबा न देता बेरोजगार केले याची खंत टाटांनी न्युज वेबसाइट युअर स्टोरी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.