‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’, करीना कपूर खानला नेटकऱ्यांचा विरोध

मुंबई। ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. अशातच लाडक्या ‘बेबो’वर नेटकरी संतप्त झाले आहेत. ट्विटरवर करीना कपूर खान हिच्या बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे.

सध्या ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे. नेटकरी संतप्त होण्यामागचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, करीना कपूर एका चित्रपटात ‘माता सीता’ची भूमिका साकारणार आहे आणि यासाठी तिने तब्बल 12 कोटींची मागणी केली आहे.

मात्र ज्यावेळी ही माहित नेटकऱ्यांपर्यत पोहचली तेव्हा सर्वानी संताप व्यक्त केला. त्यानंतर करीनाने आता सीतेची भूमिका साकारू नये, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. ट्विटरवर #BoycottKareenaKhan हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

त्यानंतर आता चित्रपटाचे लेखक के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी देखील आता या अहवालांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले होते. त्यांनी असे म्हटले होते की, करीनाला या चित्रपटाची ऑफर देण्यात आलेली नाही. त्याच वेळी, अशी बातमी देखील आली होती की करीना या चित्रपटासाठी परिपूर्ण नाही, म्हणूनच ही बातमी खोटी असल्याचे देखील बोलले जात आहे.

करिनाने आतापर्यत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या बोल्ड अंदाजाने ती कायम चर्चेत असते. मात्र आता ‘सीता मातेची’ भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याकडे नेटकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच ‘रामायण’ या चित्रपटात रणवीर सिंगला रावणाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या
सीट मिळवण्यासाठी तरुणाची भन्नाट कल्पना, एकदा व्हिडिओ बघाल तर हसू आवरणार नाही
मुस्लिमांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले, तरच सामाजिक समस्यांवर तोडगा निघेल- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा
बाबो! नवरदेव नवरीच्या हाताने मिठाई खाताना करत होता नाटकं; संतापलेल्या नवरीने पहा मग काय केले
रेमो डिसोजाने सांगितली आठवण, म्हणाला, सुशांतच्या ‘या’ आठवणीने आजही अंगावर शहारे येतात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.