अवघ्या दीड रुपयांची ‘ही’ गोळी ठरत आहे कोरोनावर प्रभावी; वाचवले कित्येकांचे प्राण

 

मुंबई | कोरोनाची लस तयार करण्यासाठी संपूर्ण जगात प्रयत्न सुरू आहेत. पण दीड रुपयांची एक गोळी सध्या कोरोनावर खूप प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे.

मेटफार्मिन असे या गोळीचे नाव असून या गोळीचा वापर आधीपासूनच मधुमेहाच्या रुग्णांवर करण्यात येत होता. पण आता या गोळीचा वापर कोरोना रुग्णांवर केला जात आहे.

कोरोनावर उपचार करण्यासाठी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या औषधांवर संशोधन चालू होते. या संशोधनातून मेटा फार्मिंन ही गोळी कोरोनावर प्रभावी असल्याचे समोर आले आहे.

या गोळीचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे चीनमधील डॉक्टरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आता जगभरातील डॉक्टरांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.