तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय? थांबा! ‘या’ शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या; अन्यथा…

मुंबई | अलीकडे अनेक नागरिक हे ऑनलाईन शॉपिंगला अधिक प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे वेळ, प्रवास यांसाठी वेळ खर्च होतं नाही. मात्र काळजीपूर्वक आपण ऑनलाईन शॉपिंग केली पाहिजे. याचबरोबर आपण अनेक वेळा ऑनलाईन शॉपिंगपासून झालेल्या फसवणूकीच्या देखील बातम्या वाचल्या असतील.

आज आम्ही तुम्हाला याबाबतच सांगणार आहोत. यामध्ये ऑनलाईन  शॉपिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ नीट समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा फवणूकीची मोठी शक्यता निर्माण होऊ शकते. तर जाणून घेऊयात असे कोणते शब्द ऑनलाईन  शॉपिंग करताना महत्त्वाचे आहे.

डिस्काउंट –
अनेज वेळा डिस्काउंट हा शब्द पाहिल्या बरोबर आपल्याला खूप आनंद होतो. याचे कारण असे की आपल्याला कमी किमतीत आपल्या आवडीची गोष्ट मिळणार असते. मात्र जुना स्टॉक संपवण्यासाठीही ही ऑफर वापरली जाते. त्यामुळे अधिक डिस्काउंट असलेल्या वस्तू घेताना त्या सावधगिरी बाळगून घेणं गरजेचं आहे.

कॅशबॅक –
अलीकडे तुम्ही सर्वांनी कॅशबॅक हा शब्द अनेकदा ऐकला असेलच. मात्र नक्की कॅशबॅक म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. कॅशबॅक अंतर्गत ग्राहकाला उत्पादनाच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम परत मिळते. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कॅशबॅकचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

कॅशबॅक किती मिळेल?
ऑनलाईन खरेदी करताना कॅशबॅकच्या नियम-अटी लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन पोर्टलद्वारा, देण्यात येणारे कॅशबॅक नियम-अटींच्या आधारे असतात. एखाद्या विशिष्ट वस्तूवर किती कॅशबॅक आहे, तेही तपासणं आवश्यक आहे.

कॅशबॅक कधी मिळेल?
कॅशबॅक कधी, कुठे मिळणार आहे याबाबत आपल्याला माहिती असणे महत्त्वाचे आहे. अनेकदा कंपन्या, आपल्या ऑनलाईन वॉलेटमध्ये कॅशबॅक देतात. त्यामुळे पुन्हा शॉपिंग करताना तो कॅशबॅक वापरात येऊ शकतो. तसेच बँक अकाउंटमध्ये देखील कॅशबॅक दिला जातो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.