पाषाणमध्ये ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; बँक व्यवस्थापकासह संगणक अभियंत्याला अटक

पुणे । पुणे शहर पोलिसांनी एका ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील प्रमुख आरोपी एका बँकेत सहायक व्यकस्थापक आणि दुसरा आरोपी संगणक अभियंता म्हणून काम करत आहे.

या आरोपींनी या सेक्स रॅकेटसाठी एक वेबसाईटवर चालू केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका रो हाऊस मालकासह चौघांना अटक केली आहे.

सुरेश रणविर, नाकसेन गजघाटे, रविकांत पासवान, दिपक शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. एक आरोपी अजूनही फरारी आहे. पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत.

हा सर्व प्रकार ओयो हॉटेल रो हाऊस नंबर 1 पाषाण धनकुडे येथे सुरू होता. आरोपींकडून मोबाईल, गाडी, लॅपटॉप, ताब्यात घेतले आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त सुनिल फुलानी, पंकज देशमुख लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.