धक्कादायक! ऑनलाइन देह व्यापार, २० हजारात मुली, व्हाट्सअँपवर होतेय डील

अलीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे मात्र अनेकदा धक्कादायक घटना समोर येत असतात. आता नोएडामध्ये अनेकजण ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून देहविक्री व्यापार वाढवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील गेस्ट हाऊसमधून ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून देह विक्री व्यापर करणाऱ्या दोन टोळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

यामध्ये दोन आरोपींना अटक केली आहे. याशिवाय दोन तरुणीदेखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. नेपाळ निवासी बुद्धिमान लामा आणि पंजाबमधील निवासी मोनू ही आरोपींची नावे आहेत. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. फरार आरोपींचा पोलिस तपास करत आहेत.

तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यापैकी एक नेपाळची आणि दुसरी वेस्ट बंगालची आहे. त्यामुळे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाजूनेदेखील तपास करावा लागेल. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने याबाबत सूचना दिली होती. एक टोळी महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती. या व्यक्तीने इमेलद्वारे नंबरदेखील शेअर केला होता. व्हाट्सअँपद्वारे ही डील केली जाते. यानंतर मुलींना देह व्यापारासाठी त्या ठिकाणी पाठवले जाते.

यामुळे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी वार्ता करण्यास सुरुवात केली आणि टोळीतील सदस्यांसोबत शनिवारी डिल नक्की केली. सापळा रचल्यानंतर जेव्हा टोळीतील दोन सदस्य शनिवारी निर्धारित ठिकाणी मुलींना सोडण्यासाठी आले तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले.

आरोपींजवळ एक गाडी आणि तीन मोबाइलसह २४,९३० रुपयांची कॅश सापडली आहे. एक आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

हीच आहे का ती भोळी भाबडी ‘गंगी’? राजश्री लांडगेचा ग्लॅमरस लुक पाहून तुमचे होश उडतील

विराट कोहलीचा भर मैदानातील भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, एकदा व्हिडिओ पहाच

अभिनेत्रींनापण लाजवेल असा ‘या’ भारतीय महिला क्रिकेटरचा लूक, चाहते घायाळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.