भाड्याने पंडित देण्याचा सुरू केला बिजनेस, दरवर्षी कमावतात ७० कोटी रूपये

आताची गरज पाहता लोकांना घरबसल्या एखादे काम हवे आहे. तंत्रज्ञानाने असे नवीन स्टार्टअप्स तयार केले आहेत आपण घरातूनच रोजगार निर्मिती करू शकतो. माय ओम नमो अँप देखील एक असे अँप आहे, ज्यामुळे पूजा आता वेगळी आणि खास बनली आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून पंडित बुक करता येतात आणि पूजा साहित्याचे ई-स्टोअरमध्ये ऑर्डर देखील घेतले जातात. फुले, केळीची पाने आणि प्रसाद या सगळ्या वस्तू या ऍपवर मिळतात. २०२०२ पर्यंत कंपनीचे मूल्य १० करोड डॉलर्स करणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

कंपनीकडे सध्या २५०० नोंदणीकृत पुजारी आहेत जे १२ भाषांमध्ये पूजा करू शकतात. गेल्या २ वर्षात कंपनीने भारतात ५००० पेक्षा जास्त आणि यूएईमध्ये १००० हून अधिक पूजा केल्या आहेत. मकरंद पाटील ग्राहकांसाठी माय ओम नमो अ‍ॅप घेऊन आले आहेत.

मकरंद आणि त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यात्माशी संबंधित सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि कठोर संशोधनानंतर २०१६ मध्ये तीव्र संशोधनानंतर वन स्टॉप माय ओम नमोची सुरूवात झाली.

आज या अ‍ॅपवर ग्राहकांसाठी १५६ पूजेचे पर्याय आहेत. हा व्यवसाय सुरू करताना ग्राहकांना पूजा करण्यात कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने हे ऍप तयार करण्यात आले आहे. ३० अब्ज डॉलर्सच्या व्हर्च्युअल मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री मिळविण्यासाठी या क्षेत्राची मर्यादा समजून घेणे आवश्यक होते आणि या कार्यासाठी त्यांनी अनेक लोकांकडून मार्गदर्शन घेतले.

माय ओम नमोच्या ई-स्टोअरमध्ये सेंद्रिय पूजा सामग्रीव्यतिरिक्त दैनंदिन पंडित क्रियाकल्प, ब्राह्मण भोज, भजन कीर्तन, माता की चौकी, मंदिरात दान, दक्षिणा, मंदिरात व्हीआयपी प्रवेश यासारख्या सेवा आहेत. याव्यतिरिक्त, ऍस्ट्रॉलॉजी, वास्तु एक्सपर्ट, टॅरो कार्ड रीडर या सेवा देखील तुम्ही घेऊ शकता.

ग्राहकांच्या सूचना व गरजा लक्षात घेऊन कंपनी या प्लॅटफॉर्मवर नवीन सेवा जोडत राहते. माय ओम नमो मधील संस्थापकांनी ५ दशलक्षची प्रारंभिक भांडवल ठेवले होते आणि भारतातील १० शहरे आणि युएई, स्पेन घाना सारख्या बाजारपेठा अवघ्या दोन वर्षांत गाठल्या.

अलीकडेच, कंपनीने यूएईच्या एचएनआय कडून प्री-सीरिजसाठी १० लाख डॉलर निधी जमा केला आहे. आता माय ओम नमोची व्याप्ती मलेशिया, सिंगापूर, बहरीन, ओमान आणि ब्रिटनच्या बाजारात वाढणार आहे. त्याचबरोबर संस्थापक मुलांसाठी हिंदू पौराणिक कथेवर व्यंगचित्र मालिका तयार करण्याची तयारी करत आहेत.

२०२० पर्यंत कंपनीचे मूल्य १० करोड डॉलर्स करायचे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. कंपनीचे वार्षिक उत्पन्न सुमारे ७० कोटी रुपये आहे. अध्यात्म आणि टेक्नॉलॉजी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे माय ओम नमो ऍप. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहीती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
वा रे पठ्ठ्या! शेतकऱ्याने बांध कोरून चक्क आपल्या देशाचे क्षेत्रफळच वाढवले
ना रेमडीसीवीर, ना व्हेंटीलेटर तरीही २९ हजार रूग्णांना बरे करणाऱ्या डाॅक्टरवर गुन्हा दाखल
VIDEO: हिंदूस्थानी भाऊला पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण…
प्रेरणादायी! आठवीला नापास झाला पण जिद्द सोडली नाही, उभी केली करोडो रूपयांची कंपनी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.