Share

Onion Market Crash : लाल कांद्याच्या आवकेने गावरान कांद्याचे दर घसरले; शेतकरी चिंतेत

Onion Market Crash : शेतकरी बळीराजानं (Farmer Baliraja) मोठ्या आशेने गावरान कांदा (Gavran Onion) चाळीत साठवून ठेवला होता. चांगल्या दराची अपेक्षा होती, पण अचानक लाल कांद्याची (Red Onion Arrival) आवक वाढली आणि बाजारात गावरान कांद्याच्या भावाला फटका बसला. हवामानातील वारंवार बदलामुळे आधीच साठवलेला कांदा कुजायला लागला असून शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahuri Market Committee) रविवारी कांद्याला फक्त १ हजार ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्या दिवशी तब्बल १९ हजार ७५८ गोण्या बाजारात दाखल झाल्या. वाढत्या आवकेमुळे शेतकरी अधिकच कोंडीत सापडले आहेत. यामध्ये शासनाकडून कांदा दरवाढीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने नाराजी उसळली आहे. शिवाय केंद्र सरकारची निर्यातबंदी कायम असल्याने भाव आणखी घसरले आहेत.

बँका, सोसायट्या आणि पतसंस्थांचे कर्ज फेडणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे. हवामान प्रतिकूल ठरल्याने उत्पादन कमी झाले आणि साठवलेला कांदा कुजल्याने शेतकऱ्यांना तो अत्यल्प दरात विकावा लागत आहे.

शेतकऱ्यांच्या मते, कांदा पिकवण्यासाठी एकरी सरासरी ८० ते ९० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यातच जवळपास अर्धा कांदा चाळीत सडल्याने नुकसान दुप्पट झाले आहे. त्यामुळे कांद्याला किमान ३ ते ३,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळालाच पाहिजे, अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.

सध्या अशी स्थिती आहे की कांदा साठवला तर सडतो, विकला तर तोट्यात जातो. शेतकरी अस्वस्थ आहेत आणि सरकारने आता तरी लक्ष द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh Government) आपल्या राज्यातील कांद्याच्या विक्रीला प्राधान्य दिल्याने बाहेरच्या बाजारात मागणी घटली आहे. सध्या आंध्र, तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटक (Karnataka) येथे कांद्याची आवक सुरू असली तरी निकट भविष्यात भाव वाढण्याची शक्यता अत्यल्प असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now