एकनाथ खडसे मंगळवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना विधानपरिषदेतील आमदारकीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावेळी “पवार साहेबांनी मला आमदार करायचे ठरवले तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार” असा टोला नाथाभाऊंनी भाजपला लगावला आहे.
राष्ट्रवादी तर्फे एकनाथ खडसेंचे नाव राज्यपालांकडे पाठवण्यात आलं असून अद्यापही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावर निर्णय घेतलेला नाही. त्यावरच नाथाभाऊंनी आता ही प्रतिक्रिया दिली आहे.
‘पवार साहेबांनी नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर तुमच्या मतदानाची गरज लागणार नाही,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली आहे. विधानपरिषदेतील आमदारकीविषयी त्यांना विचारले असता भाजपला त्यांनी टोला लगावला आहे.
“एकनाथ खडसे संपले असे कालपर्यंत अनेक लोक म्हणत होते. पण, नाथाभाऊंनी आता एकच प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्र हादरला. हे तर पहिलेच प्रकरण आहे, अजून कितीतरी प्रकरणे बाकी आहेत. मोठी राजकीय गँग पहिल्या प्रकरणात अडकली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाचाही यामध्ये समावेश नसल्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.”
महत्वाच्या बातम्या
…अन् पोलिसांनी थेट राजू शेट्टींच्या कॉलरला घातला हात आंदोलनात कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची धग महाराष्ट्रात; कोल्हापुरात स्वाभिमानी च्या आंदोलनात वादावादी
३२ वर्षांपूर्वी! कॉंग्रेस सरकारला झुकवणाऱ्या रांगड्या नेत्याच्या एक हाकेने जमा झाले होते लाखो शेतकरी