बिटकाॅइनची दरोडेखोर राणी! ‘या’ ३५ वर्षीय महिलेने घातलाय तब्बल ९० हजार कोटींचा दरोडा

मुंबई | सन २०१६ मध्ये क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची लहर कमी होत होती. याचे कारण तेव्हा बाजारात आलेले नवे क्रिप्टो चलन होते. त्याचं नाव ‘वनकॉइन’ असे ठेवण्यात आले. हे क्रिप्टो चलन बल्गेरियातील एका कंपनीने आणले होते. या कंपनीची मालकिन रुजा इग्नाटोवा नावाची सुंदर महिला होती.

रुजा इग्नाटोवा ही महिला खूपच सुंदर होती. याशिवाय ती स्वतः या क्रिप्टो चलनाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील होती. रुजा इग्नाटोवाने जगभर फिरून वनकॉइनचा प्रचार केला. ती सांगायची वनकॉइन हे भविष्यातील चलन आहे. त्यात गुंतवणूक करणे खूपच सुरक्षित आहे आणि हेच चलन सर्वात जास्त फायदा देणारे आहे.

इतकेच नाही तर रुजाने वनकॉइनला बिटकॉइनचा किलर म्हणून संबोधले. वनकॉइनच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. त्यामुळे बाजारही तेच संकेत देत होते. लोक वनकॉइन या क्रिप्टोकरन्सीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते. त्यामुळेच तेव्हा वनकॉइन म्हणजे बिटकॉइन किलर असं म्हटलं जात होतं.

रुजाबद्दलची काही माहिती वृत्त अहवालात छापून आली आहे. तिचा जन्म बल्गेरियात झाला होता. रुजा इग्नाटोव्हाने ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले आणि जर्मनीतील विद्यापीठातून पीएचडी केली आहे. पीएचडीनंतर तिने मॅकेन्झी ऐंड कंपनीमध्ये काम केले. ही कंपनी जगातील नामांकित व्यवसाय सल्लागार कंपनी आहे.

रुजाने अवघ्या तीन वर्षात (२०१४-२०१६) जगभरातून सुमारे १२ अब्ज डॉलर्स जमा केले. ती जगभरात क्रिप्टो चलनाची राणी म्हणून ओळखली जाऊ लागली. मोठ-मोठ्या मीडिया हाऊसेसने तिच्या यशावर कव्हर स्टोरीज केल्या. अशात सन २०१७ मध्ये रूजा म्हणाली की ती एक नवीन योजना आणणार आहे. आणि ती अचानक गायब झाली.

रुजा फरार झाल्याने जगभरातील गुंतवणूकदार उद्ध्वस्त झाले. एफबीआय आणि एमआय 5 सारख्या एजन्सी तिचा शोध घेत आहेत. असे म्हटले जाते की तिने आपली प्लास्टिक सर्जरी केली आणि चेहरा बदलला आहे. सध्या ती ४१ वर्षांची असेल परंतु गेल्या ४ वर्षांपासून कोणीही तिला पाहिले नाही.

अशाप्रकारे रुजाने अवघ्या ३ वर्षात ९० हजार कोटींपेक्षा जास्त पैसे ढापले आणि अचानक गायब झाली. वनकॉइन हे प्रकरण सोडविण्यात जगातील शोध एजन्सी अपयशी ठरल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या उपचारासाठी दोघा मित्रांनी दोन दिवसात जमा केले ३० लाख
बहिणीचं कोरोनाने निधन झाल्यावर भावाचे डोळे फिरले; बहिणीचे १२ लाखाचे दागिने आणि पैसे हडपले
सलमानच्या राधे चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी सर्व रेकॉर्ड तोडत कमवले ‘इतके’ कोटी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.