एकतर्फी प्रेमाने केलं विवाहित तरुणीचं आयुष्य उध्वस्त; तरुणीची 7 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

मुंबई। आपण प्रेमाच्या अनेक कहाण्या ऐकल्या आहेत. यामध्ये बऱ्याचशा कहाण्या या एकतर्फी प्रेमाच्या असल्याचेही आपण ऐकल्या आहेत. मात्र हे एकतर्फी प्रेम अनेकदा अनेकांना महागात पडलं आहे. या प्रेमापायी प्रियकर किंवा प्रियसी आपलं जीवन संपवत असतात.

अनेकदा एकतर्फी प्रेम करणारा व्यक्ती हा समोरच्याला त्रास होईल यासाठी तो त्याचं प्रेम व्यक्त करत नाही. कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो किंवा ती कायम खुश रहावी असं वाटत असतं. मात्र सध्या अशी एक घटना समोर आली आहे ज्यात एकतर्फी प्रेमामुळे एका विवाहित तरुणीनं आपल्या कुटुंबाचा देखील विचार न करता त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

व यामुळे तरुणीच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तरुणीला आत्महत्येसं प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नक्की प्रकरण काय पाहुयात.

मृत तरुणीचं नाव आहे आरती. आरतीचे वडील भूदरापुरा येथे राहणारे चंदूभाई परमार एका गॅरेजमध्ये काम करतात. पाच वर्षांपूर्वी आरती हिचं अरावली येथील निवासी विष्णूभाई याच्यासोबत लग्न झालं होतं. आरतीच्या सासरी राहणारा एका तरुण तिचा पती घरी नसताना आरतीला त्रास देत असे. अनेकदा तो आरतीवर जबरदस्तीही करीत होता.

आरती आपला पती आणि मुलांसह अहमदाबाद येथे राहायला आली होती. दोघे आपल्या मुलासह सिंधुभवन रोड येथे राहत होते. मात्र जरी आरती अहमदाबादला राहायला गेली असली तरी ज्यावेळी हे दिनेशला समजले त्यावेळी तोदेखील अहमदाबाद येथे आला व वराज येथे भाड्याने घर घेऊन राहू लागला.

त्यानंतर दिनेश आरतीच्या घरी गेला मात्र आरती तिच्या वडिलांच्या घरी गेली होती. हे दिनेशला समजताच दिनेश देखील वडिलांच्या इमारतीखाली गेला व आरतीला खाली बोलावलं. त्याने आरतीला सोबत येण्यास सांगितलं. अन्यथा पती आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. जेव्हा तिच्या पतीला याबाबत कळालं, त्यानंतर त्याने आरतीच्या वडिलांना याबाबत कळवलं.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरतीने सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दिनेश याच्याविरोधात आत्महत्येसं प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र एकतर्फी प्रेमामुळे आरतीला विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. व यामुळे आरतीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महत्वाच्या बातम्या
ICICI बँकेच्या माजी मॅनेजरनेच बँकेवर टाकला दरोडा; असा आखला होता प्लॅन
मोदी म्हणतात, ‘मी चहावाला’; मात्र ‘ते चहावाले नाहीत’ म्हणत भाऊ प्रल्हाद मोदींचा मोठा गौप्यस्फोट
लस घेतल्यानंतर किती दिवस तुमचा कोरोनापासून होईल बचाव? आरोग्य मंत्रालयाने केले स्पष्ट
VIDEO: अरेरे! बिचारा फोटोग्राफर नवऱ्याला पोज दाखवायला गेला अन् स्वतःचं तोंडावर पडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.