प्रेमात वेडा झालेला १९ वर्षाचा मुलगा चढला टॉवरवर, लग्न कर नाही तर उडी घेईल; तरुणीला दिली धमकी

असे म्हणतात प्रेम आंधळे असते, त्यामुळे लोक प्रेमात काय करतील हे सांगता येत नाही. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. एका तरुणाने मुलीचा होकार मिळवण्यासाठी थेट मोबाईल टॉवरवरच चढाई केली आहे.

कोरोना काळात आपल्या प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या लोकांच्या अनेक घटना घडल्या आहे. प्रेमासाठी अनेक जण प्रेमासाठी वाट्टेल ते करतात. आता उत्तर प्रदेशमधील एक १९ वर्षीय तरुणाला मुलीचा होकार मिळत नव्हता. त्यामुळे तो मोबाईल टॉवरवर चढला आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्या तरुणीने त्याला होकार दिला आहे.

उत्तर प्रदेशच्या कन्नौज गावात ही घटना घडली आहे. एक तरुण मुलाला आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी अडून राहिला होता. त्याला त्यामुलीशी लग्न करायचे होते. त्यामुळे तो टॉवरवर चढला होता. जर लग्नाला नकार दिला तर थेट खाली उडी मारेल अशी धमकी त्याने दिली होती.मुलीने जेव्हा होकार दिला तेव्हा तो खाली आहे.

खाली आल्यानंतर त्याने आणखी एक ड्रामा केला आहे. कारण मुलीने होकार तर दिला पण आता घरच्यांकडून मारखाण्याच्या भितीने त्याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले आहे. त्यामुळे तरुण मार खाण्यापासून बचावला आहे.

गावकऱ्यांनी या सर्व प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच त्या तरुणाला पुन्हा असे काही करु नको, असा सल्ला देत, कुटुंबाच्या हवाली केले आहे.

त्या तरुणाचे वय फक्त १९ वर्षे आहे. त्याच्याच परिसरा राहणाऱ्या एका तरुणीवर त्याचे प्रेम जडले होते. त्यामुळे त्याने त्या तरुणीशी लग्न करण्याचे ठरवले. लग्नाचा प्रस्ताव मुलीच्या घरी पण मांडला होता. तेव्हा मुलीच्या घरच्यांनी नकार दिल्याने तरुणाने हा हायव्होल्टेज ड्रामा केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

एअर होस्टेसचा आशिक झाला नवाजुद्दीन, फ्लर्ट करताना कॅमेऱ्यात कैद; पहा व्हिडीओ
“पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचे आहे ते सगळं करणार”
कोरोनामुळे होऊ शकतो मधुमेह? आयसीएमआरच्या डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.