प्रेयसीच्या पतीने रंगेहाथ पकडताच पोलीसाने अंडरपॅंटवरच गॅलरीतून उडी मारली; जागीच ठार

भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर गावातून एक धक्कादायक माहिती येत आहे. ती म्हणजे या गावात मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोलिस शिपाई महेश डोगरवारचा फ्लॅटवरच त्याचा मृत्यू झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

गणेशपूर या गावात रविवार मध्यरात्री पोलिस शिपाई महेश डोगरवार त्याच्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता. पण याची माहिती महिलेच्या पतीला मिळाली. प्रेयसीचा पती रूममध्ये येत असल्याचे पाहून पोलिस शिपायाचा फ्लॅटच्या बालकनीतून उतरत असताना तोल गेला आणि तो पडला.

घरात पोलीस शिपाई आल्याची कल्पना घरातील दुसऱ्या रूममध्ये असलेल्या महिलेच्या पती आणि मुलांना आली. पतीने यासंदर्भात पत्नीला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता मद्यप्राशन केलेल्या पोलिस शिपायाने अंतर्वस्त्रांवर फ्लॅटच्या बालकनीतून खाली उतरू लागला.

पोलीस शिपाई महेशने मद्यप्राशन केल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो खाली जमिनीवर पडला. डोक्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. पण महेशचा मृत्यू झाला की हत्या करण्यात आली, याचा अधिक तपास पोलिस करीत आहे.

जंगलात मिळाली सगळ्यात दुर्मिळ मांजर, एक डोळा निळा तर एक पिवळा; किंमत वाचून अवाक व्हाल

शेतकऱ्यांपासून जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या, पहा धक्कादायक व्हिडीओ

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.