इतिहासातील सर्वात खतरनाक सीरीअल किलर, रूमालाच्या साहाय्याने केली होती ९३१ लोकांची हत्या

इतिहासात अशा अनेक कहाण्या आहेत ज्या वाचल्यानंतर अंगावर काटा येतो. असे अनेक सीरिअल किलर आहेत ज्यांनी खुप विचित्र प्रकारे लोकांचे खुन केले होते आणि एक वेगळीच दहशत निर्माण केली होती. असाच एक सीरीअल किलर होता ज्याचे नाव ऐकताच लोकांचा थरकाप उडायचा.

तसे पाहायचे झाले तर सीरीअल किलर खुन करण्यासाठी दगड, चाकू किंवा अन्य धाराधार हत्यारांचा वापर करायचे. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की सीरीअल किलरने रूमालाने कित्येक लोकांचा खुन केला होता. या सीरीअल किलरचे नाव आहे ठग बहराम.

या किलरने फक्त रूमालाच्या साहाय्याने ९०० पेक्षा जास्त लोकांची हत्या केली होती. ठग बहरामचा जन्म १७६५ मध्ये झाला होता. बहरामने १७९० आणि १८४० च्या दरम्यान इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यावेळी भारतावर ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रजांचे राज्य होते.

ठग बहरामची इतकी दहशत होती की इंग्रज त्याला खुप घाबरायचे. असे म्हणतात की बहराम ज्या रस्त्याने जायचा त्या रस्त्यावर सगळे मृतदेह पडलेले असायचे. त्यावेळी दरोडेखोरांवर अध्ययन करणारे जेम्स पैटोन यांनीसुद्धा आपल्या पुस्तकात ठग बहराम याचा उल्लेख केला आहे.

त्याने कबूल केले होते की त्याने ९३१ लोकांचा खुन केला आहे. ठग बहराम तिर्थयात्रींना, व्यापाऱ्यांना, पर्यटकांना शिकार बनवत असे. जेव्हा रात्री हे लोक झोपायचे तेव्हा तो त्यांचा खुन करत असे. ठग समाजातील लोक वेश बदलून त्यांच्यामध्ये मिसळून जायचे.

ते रडणाऱ्या गिधाडाचा आवाज काढून एकमेकांना सिग्नल देत असत. मग ठग बहराम बाकीच्या साथीदारांसोबत तिथे पोहोचायचा. त्याच्याकडे एका पिवळ्या रूमालात गुंडाळलेला धारधार नाणं असायचं. याच्या सहाय्याने तो त्या लोकांचा गळा घोटायचा.

लोक गायब होऊ लागल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका ऑफिसरला बोलविण्यात आले. त्याचे नाव कैप्टन स्लीमन होते. त्याने खुलासा केला की हे काम ठग बहराम आणि त्याच्या २०० साथिदारांचे आहे. तो खून केल्यानंतर लोकांचे मृतहेसुद्धा गायब करत असे.

ही गोष्ट १८०९ मधील आहे. हे सगळे ठग रामोशी भाषा बोलायचे. १० वर्षांनंतर बहरामला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचे वय ७५ वर्षे होते. १८४० मध्ये त्याला फाशी देण्यात आली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या

ज्याने पुण्य केले आहे तोच ‘ही’ नदी पार करू शकतो, गरूडपूराणातसुद्धा तिचा उल्लेख आहे

सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा झाला; फोटो पाहून म्हणाल, काय दिसतेय अप्सरा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.