रातोरात झाला होता स्टार पण पचवता नाही आले यश; आता काय काम करावे लागतेय पहा..

आपण आयुष्यात अनेक वेळा काहीतरी काम करायला जातो. त्या कामात आपल्याला यश देखील मिळते. पण ते यश आपल्याला टिकवून ठेवता येत नाही आणि आपण ते काम करणे बंद करतो. असे कलाकारांसोबत देखील होते.

बॉलीवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांना लगेच यश मिळाले आहे. काही कलाकारांना तर चित्रपट येण्या अगोदरच प्रसिद्धी मिळाली होती. तर काही कलाकारांना त्यांचा पहिला चित्रपट रिलीज झाल्यानंतर यश मिळाले होते.

अशाच काही कलाकारांमध्ये अभिनेता नकूल कपूरच्या नावाचा समावेश होतो. नकूलने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्याला यश मिळाले होते. म्हणून त्याला बॉलीवूडचा नेक्स्ट सुपरस्टार समजले जाऊ लागले होते.

पण नकूल कपूर मात्र वन फिल्म स्टार बनून राहिला. त्याला बॉलीवूडच्या फक्त चित्रपटासाठी ओळखले जाते. हा चित्रपट खुप हिट झाला होता. या चित्रपटासाठी त्याचे कौतुक करण्यात आले होते.

नकूल कपूरने १९९८ साली ‘हो गयी है मोहोब्बत’ या अल्बममधून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. या अल्बममधून त्याला काही ओळख मिळाली नव्हती. पण नकूलने हार मानली नाही. तो मेहनत करत राहिला.

त्याला २००१ मध्ये ‘आजा मेरे यार’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण त्याला या चित्रपटानेही काही खास यश मिळाले नाही. त्याला जे यश हवे होते. ते यश त्याला २००२ मध्ये मिळाले. नकुल कपूर रातोरात स्टार झाला होता.

२००२ मध्ये नकुलचा ‘तुमसे अच्छा कौन है’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक आनंदने केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला हिट झाला होता. या चित्रपटात नकुलसोबत किम शर्मा आणि आरती छाब्राने काम केले होते.

आँख है भरी भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो’ यासोबतच चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट झाली होती. आजही लोक या चित्रपटातील गाणी आवडीने ऐकतात. या चित्रपटासाठी त्याला अवॉर्ड मिळाले होते.

या चित्रपटातसोबतच या चित्रपटातील गाणे देखील हिट झाली होती. असेही बोलू शकतो की, चित्रपटापेक्षा जास्त गाणीच हिट झाली होती. त्यामूळे नकूल देखील रातोरात स्टार झाला होता. त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता.

नकुलचे लाखो फॅन्स निर्माण झाले होते. सर्वांना त्याचा अभिनय आणि लुक्सने वेड लावले होते. प्रेक्षक त्याचा दुसऱ्या चित्रपटाची वाट पाहत होते. पण नकूल मात्र दुसऱ्या कोणत्याही हिट चित्रपटात दिसला नाही. त्याचे दुसरे सगळे चित्रपट फ्लॉप झाले होते.

नकूल कपूरला त्याचे स्टारडम सांभाळता आले नाही. कारण त्याने या अगोदर कधीही एवढे स्टारडम आणि एवढे फॅन्स बघितले नव्हते. त्याला त्याच्या फॅन्सची इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत. तो दुसरा कोणताही हिट चित्रपट देऊ शकला नाही.

नकुल कपूरने बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्याला योग्य काम मिळत नव्हते. म्हणून त्याला स्टारडम सांभाळता आले नाही. या सर्व गोष्टींचा त्याला कंटाळा आला.

शेवटी एक दिवस नकूल कपूर बॉलीवूडमधून गायब झाला. अनेक वर्षे कोणालाही त्याच्याबद्दल काहीही माहीती नव्हती. २०१६ मध्ये बातम्या आल्या की, नकूल कपूरचा मृत्यू झाला आहे. या बातमीने मात्र सर्वांना धक्का बसला.

शेवटी नकूल कपूरने त्याच्या सोशल मीडिया आकाउंटवरुन माहीती दिली की तो जिवंत आहे. तो सध्या कॅनडामध्ये आहे आणि योगा ट्रेनर म्हणून काम करत आहे. तो या कामात आनंदी आहे.

त्याने सांगितले की, ‘मला पहिल्या चित्रपटानंतर बॉलीवूडमध्ये चांगले काम मिळत नव्हते. जे चित्रपट मिळत होते ते यशस्वी होते नव्हते. म्हणून मी अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आवडीचे काम करायला सुरुवात केली’.

महत्त्वाच्या बातम्या –

केवळ आईसक्रीमसाठी अजय देवगनने १० तास थांबवली शुटींग; पहा नेमकं काय घडलं..

‘या’ हिरोईनच्या प्रेमात पागल झाला होता बाॅबी देओल; पण केवळ वडीलांच्या इच्छेखातीर..

रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.