अजून एक धक्का! सुशांतच्या फार्महाऊसवर पार्टीसाठी आली होती श्रद्धा कपूर

मुंबई| सुशांत प्रकरण ड्रग्समुळे दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. रोज एका नवीन गोष्टीचे धागेदोरे हाती सापडत आहेत. सुशांत सिंह राजपुत आपल्या लोणावळ्यामधील फार्महाऊसमध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांसोबत पार्ट्या करायचा असे समोर आले आहे.
सुशांतचा छिछोरे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याची सक्सेस पार्टी झाली होती. ही पार्टी सुशांतच्या लोणावळ्यातील फार्महाऊसमध्ये झाली होती. या पार्टीला अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील उपस्थित होती.

या पार्टीमध्ये फिल्मचा संपूर्ण स्टारकास्ट सहभागी होता. या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा वापर करण्यात आला होता. श्रद्धा कपूर सोबतच अजून एक सिनेअभिनेत्री उपस्थित होती मात्र तिचे नाव अजून गूढच आहे.

या फार्महाऊसची देखभाल करणाऱ्या रियाजने सांगितले की, सुशांत या फार्महाऊसवरती महिन्यात किमान चार वेळा तरी येत असे. छिछोरे सिनेमाचे शुटींग पुण्यात सुरु असताना श्रद्धा कपूर ही देखील फार्महाऊसवरती आली होती.

अलीकडे टाकलेल्या छाप्यामध्ये सुशांतच्या या फार्महाऊसवरती ड्रग्सशी संबंधित वस्तू सापडल्या आहेत. सुशांत इथे ड्रग्स पार्टी करत असल्याचे यातून समोर आले. या फार्महाऊसच्या देखभालीसाठी सुशांत दरमहा दोन लाख रुपये देत असे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.