राष्ट्रवादीला मोठा धक्का; आणखी एक पुतण्या काकांविरोधात उतरणार मैदानात

अकलूजमधून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. कारण अकलूज येथील राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष डाँ धवलसिंह मोहिते पाटील उद्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. २८ जानेवारी रोजी ते आपल्या समर्थकांसह मुंबईतील काँग्रेस भवनात धवलसिंह मोहिते पाटलांचा प्रवेश सोहळा होणार आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. धवलसिंह मोहिते पाटील हे भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मोहिते पाटील आधी शिवसेनेत होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आता ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत.

विधान सभा निवडणुकीत धवलसिंह यानी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचार केला होता. पण राष्ट्रवादीने पक्षाने आपली दखल घेतली नसल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजत आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर, डॉ धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते. उद्या दुपारी तीन वाजता मुंबईमधील टिळक भवनात काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटिलसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार; मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती..

आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्मह.त्या; त्याआधी फेसबुक पोस्ट करत म्हणाली…

‘असा एकही दिवस जात नाही शीतल…’ लेकीच्या आठवणीत डॉ. विकास आमटे भावुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.