ड्रग्ज प्रकरणात बाॅलीवूडचा आणखी एक प्रसिद्ध अभिनेता अडकला; पोलीसांचा थेट घरावर छापा

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा झाला होता. त्यातले सर्वात जास्त गाजलेले प्रकरण म्हणजे ड्रगचे. ड्रग प्रकरणात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. त्यामूळे हे प्रकरण खुप गाजले होते.

फक्त बॉलीवूडच नाही तर सँडलवूड म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग प्रकरण देखील समोर आले आहे. यामध्ये अनेक कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात अभिनेत्री रागिनी द्विवेदीचे नाव समोर आले होते. त्यानंतर आत्ता आदित्य अल्वाचे नाव समोर आले आहे. आदित्य अल्वा बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या पतीनीचा भाऊ आहे. कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे.

कर्नाटकच्या हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये आदित्यचे नाव येते. पण हे प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. पोलिसांना खबर मिळाली होती की, तो मुंबईत विवेकच्या घरी आहे. म्हणून कर्नाटक पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत.

आदित्य अल्वा विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पोलीस मुंबईत पोहोचले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घराची तपासणी सुरू केली आहे. काल दुपारी दोन वाजता पोलीस विवेकच्या घरी दाखल झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

बाॅलीवूडचे सर्व लांडगे आता एकत्र आलेत; महीलांवर, शेतकऱ्यांवर अन्याय होतो तेव्हा हे कुठे जातात

पतीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री मयूरी देशमुखने पहिल्यांदाच केला अनेक गोष्टींचा खुलासा

भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवणार?

सुशांत केसची सीबीआयची चौकशी पुर्ण हायकोर्टात अहवाल देणार; जाणून घ्या काय निष्कर्ष निघाला..

..हे सहन केले जाणार नाही; बॉलीवूडमधील वादावर उद्धव ठाकरेंनी पहील्यांदाच उघडले तोंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.