देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा; १० दिवस व्हेंटिलेटरवर राहून हरवले कोरोनाला

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यु झाला आहे. अशात अनेक लोकांनी कोरोनाला हरवले पण आहे. १०० पेक्षा जास्त वय असणारे लोकही कोरोनाला हरवत आहे.

आता आज आम्ही तुम्हाला अशा एका कोरोना योद्धाबद्दल सांगणार आहोत जो देशातली सर्वात लहान कोरोना योद्धा असून बाळाने कोरोनाला हरवले आहे. विशेष म्हणजे १० दिवस बाळाने व्हेंटिलेटरवर राहून कोरोनावर मात केली आहे.

ओडिशामध्ये कोरोनाशी संक्रमित असलेल्या एका महिन्याच्या चिमुकलीने सर्वांनाच हैराण केला आहे. नुकताच एक महिन्यापुर्वी जन्म झालेल्या या मुलीवर भुवनेश्वरच्या एका रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु होते. १० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणाऱ्या चिमुकलीने कोरोनावर मात केली आहे. आता ती देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा बनली आहे.

या मुलीवर रेमडेसिवीर, स्टेयरेड आणि विविध प्रकारचे उपचार करण्यात आले होते. २ आठवड्यापासून तिच्यावर उपचार सुरु होते. आता तिने कोरोनावर मात केली असून ती पुर्णपणे बरी आहे. लवकरच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असे डॉ. अरिजीत पात्रा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ओडिशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तिथे दिवसाला तब्बल १२ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ८८ हजार ६८७ इतकी आहे.

तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्युचा आकडा पण ओडिशामध्ये वाढत चालला आहे. आतापर्यंत २ हजार २७३ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बाबो! आकाशातून पडलेल्या १०३ किलोच्या दगडाने मेंढपाळ झाला करोडपती; वाचा पुर्ण किस्सा
माधुरी दीक्षितच्या आई वडिलांनी सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि…
तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं, तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही; आनंद महिंद्राही झाले भावूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.