वृषाली आणि अतुलचा अवघ्या २१ दिवसांचा संसार नदीने तिच्या पोटात सामावून घेतला

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. लग्न म्हणजे दोन जीवांनी एकत्र येऊन एकमेकांसोबत राहण्याचे वचन. लग्न झाल्यावर कायम आपल्या जोडीदारासोबत राहावे असे प्रत्येकाला वाटते. पण हेच लग्न जर अर्ध्यावर स्वप्न बनून राहिले तर…

वर्धा जिल्यातील अशीच एक नव विवाहित दांपत्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरूड जिल्यातील गाडेगाव येथील वृषाली ही वर्धा जिल्यातील आष्टी येथील अतुल वाघमारे याच्यासोबत लग्नबंधनात अडकली.

२२ ऑगस्ट रोजी वृषाली आणि अतुलच्या परिवाराच्या आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लावून देण्यात आले. २१ दिवसांचा संसार चांगला चालला होता पण अचानक गाडेगाव येथून वृषालीच्या माहेरच्या नातेवाईकांची मृत्यू झाल्याची घटना समजली. यानंतर १४ सप्टेंबर रोजी दशक्रियेचा कार्यक्रम होता म्हणून नवीन जोडपं गाडेगावला वृषालीच्या माहेरी गेलं.

यानंतर दोघेही नातेवाईकांसोबत राख शिरवायला बोटीत बसून गेले. राख शिरवली आणि त्यानंतर नदीने भयंकर रूप धारण केलं आणि या नवीन दांपत्यासह वृषालीचे ११ नातेवाईक नदीत बुडाले.

तब्बल ४८ तासांनी दोघांचेही मृतदेह सापडले. दोघांचेही मृतदेह घरी आणले तेव्हा घरच्यांनी हंबरडा फोडला. अशा प्रकारे झालेल्या नियतीच्या घाताने अनेकांचे हृदय पिळवटून टाकले.

गुण्यागोविंदाने चाललेल्या संसाराला नजर लागावी असं झालं आणि वृषाली आणि अतुलचा अवघ्या २१ दिवसांचा संसार नदीने तिच्या पोटात सामावून घेतला.

 

महत्वाच्या बातम्या
अजबच परंपरा! आवडता जोडीदार मिळेपर्यंत तरुणी बनवू शकतात तरुणांसोबत शारीरिक संबंध; हा समाज देतो मान्यता
गांजाच्या शॉपमध्ये चोरी करण्याचा प्लॅन होता चोरांचा, एकट्या कर्मचाऱ्याने तिघांना लावले पळवून; पहा थरारक व्हिडिओ
TCS मधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून शेती करतेय ही तरुणी, आज वर्षाला कमावतेय तब्बल २० कोटी रुपये!
अजितदादा तब्बल १३ नगरसेवक फोडत भाजपला देणार मोठा धक्का; स्वत:च केले जाहीर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.