‘मास्क न वापरल्यास एक लाख दंड व दोन वर्षांची जेल; ‘या’ राज्याचा कठोर निर्णय’

 

रांची | देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच यामुळे कोरोनाचा संसर्ग देखील वाढत चालला आहे. आता कोरोना संकट रोखण्यासाठी झारखंड सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

जो कोणी मास्कचा वापर करणार नाही किंवा कोरोना नियमांचे उल्लंघन करेल, त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यासोबत दोन वर्षांची जेलही होऊ शकते, असा निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे.

झारखंड सरकारकडून हा कोरोना प्रादुर्भाव २०२० अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच या अध्यादेशाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजूरही करण्यात आलेले आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव २०२० च्या अध्यादेशातील ३९ प्रस्तावांना मंजुरी दिली गेली आहे. मात्र या लाख रुपयांच्या दंडाची चर्चा देशभर सुरू आहे. तर आता या निर्णयामुळे नागरिकही धास्तावले आहे.

दरम्यान, झारखंडमध्ये काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. लोकांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे, असे झारखंड सरकारने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.