देशात कोरोनाचा हाहाकार; पहील्यांदाचा रूग्णसंख्येने केला एक लाखांचा आकडा पार

 

देशभरात कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.  अशात गेल्या २४ तासात १ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण भेटले आहे, तर ४७८ रुग्णांनी जीव गमावला आहे.

अशात मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा कोरोनाच्या तावडीत सापडले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विक्की कौशलला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. विक्की कौशल सध्या होम क्वारंटाईन आहे.

अक्षय कुमारनंतर भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी आपली कोरोना करून घ्यावी, असे भूमी पेडणेकरने म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीच्या एका शाळेत ९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या राजेंद्र नगरच्या आर्य कन्या गुरुकुल शाळेत ९ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या पुढच्या आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.