कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये अजुनही लॉकडाऊन चालू आहे. त्या देशांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम करण्यात आले आहे. कॅनडामध्येही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियम करण्यात आले आहे. कॅनडामध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. पण यादरम्यान कॅनडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
कॅनडामध्ये चार आठवड्यांचा कर्फ्यू लावला असून सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत लोकांना बाहेर फिरता येणार नाही. फक्त महत्वाच्या कामासांठीच लोक घराबाहेर पडू शकतात. यादरम्यान किंग स्ट्रिट ईस्टमध्ये एका महिलेने पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून ठेवला होता आणि रस्त्यावर एखाद्या कुत्र्याप्रमाणे आपल्या पतीला फिरवत होती.
जेव्हा या महिलेला पोलीसांनी पकडलं तेव्हा ती पोलिसांशी बोलण्यास तयार नव्हती. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी या दोघांना १५००-१५०० डॉलर दंड लावला आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार २ लाखांचा दंड लावला आहे.
लॉकडाऊनच्या वेळेत ‘तू इथं काय करत आहेत.’ अशी विचारणा पोलीसांनी केली. त्यावर ती महिला म्हणाली, ”मी माझ्या पाळीव प्राण्याला फिरवत आहे आणि पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.”
मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
‘या’ व्यक्तींना लस मिळणार नाही’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे वक्तव्य
राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा जावई एनसीबीच्या रडारवर; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ