महीलेने कारल्याचा ज्युस पिऊन तब्बल ४० किलो वजन घटवले; लोकांच्या टोमण्यांनी झालती हैराण

लठ्ठपणा ही एक अशी समस्या आहे जी सर्व वयोगटातील लोकांना त्रास देते. याचा परिणाम केवळ महिला आणि पुरुषांवरच नाही तर शाळकरी आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुला-मुलींवरही होतो. परंतु आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करून लठ्ठपणा कमी केला जाऊ शकतो.

आग्रा येथील रहिवासी हर्षिका कपूरचे शालेय जीवनापासूनच वजन जास्त होते. वयाच्या 18 व्या वर्षी तिचे वजन 90 किलोच्या वर पोहोचले. यामुळे तिच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम झाला. लठ्ठपणामुळे तिला स्वतःच्या शरीराची लाज वाटू लागली. यामुळे हर्षिकाने पटकन वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तिने तब्बल 40 किलो वजन कमी केले नाही, तर तिने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे.

हर्षिका सांगते, “मी लहानपणापासूनच लठ्ठ होती. खरं सांगायचे झाले तर, जेव्हा मी बारावी पूर्ण केली, तेव्हा माझे वजन 90 किलो होते. आपण आपल्या मित्र मैत्रिणींपेक्षा वेगळे दिसत आहोत, यामुळे मी व्यायाम करण्यास सुरुवात केली. तंदुरुस्त होण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणे हे माझ्यासाठी एक आव्हान होते. मला कितीही वेळ लागला तरी मी वजन कमी करेन असा माझा अट्टहास होता”.

हर्षिका पुढे म्हणाली, “मी माझे वजन कमी करण्यासाठी दररोज चढाईच्या भागात 10-11 किमी चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०२० मध्ये, मी एका जिममध्ये प्रवेश घेतला ज्यामध्ये मी वजन कमी करण्यासाठी चरबी जाळणे आणि टोनिंग व्यायाम करायची.मी दररोज 7 सेट बैसेप्स, 25 पुशअप्स, आणि वेट ट्रेनिंग घेत असे. यामुळे वजन कमी करण्यात मला खूप मदत झाली”.

लठ्ठपणामुळे हर्षिकाला तिच्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये जायला लाज वाटत असे. यामुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला होता.

हर्षिका म्हणाली, मी माझ्या आहारातून जंक फूड आणि साखर कमी केली आणि नियमित व्यायाम केला. या साध्या आणि छोट्या बदलांमुळे एक दिवस मोठा बदल दिसला, तो म्हणजे आत्मविश्वासाने हर्षिकाने 2 वर्षात 40 किलो कमी केलेले वजन. आता ती नेहमीपेक्षा फिट आणि तंदुरूस्त दिसते.

 

महत्वाच्या बातम्या
“बचपन का प्यार” गाणे म्हणत १३ महाभाग बसले एका दुचाकीवर, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी धरले धारेवर
काय सांगता! मुली भाव देत नाहीत म्हणून पठ्ठ्याने थेट आमदाराला पत्र लिहीत केली तक्रार
…म्हणून जावयाने सासुचे गुप्तांग दगडाने ठेचले; मुंबईतील भयानक घटनेने महाराष्ट्र हादरला
‘या’ वृत्तपत्राच्या एका चुकीमुळे राजकारणात माजला हाहाकार; असे होऊ लागले आरोप-प्रत्यारोप…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.