Share

आमच्या सणांना एक दिवसाची परवानगी, मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस परवानगी कशी मिळाली? राज ठाकरे आक्रमक

सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यास सुरवात झाली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.(one-day-permission-for-our-festivals-365-days-permission-for-loudspeaker-in-mosques-raj-thackeray-is-aggressive)

जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांच्यावर कारवाई का केली जात आहे? आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. आमच्या सणांना एका दिवसाची परवानगी मिळते, मशिदींवरील भोंग्यांना वर्षभराची परवानगी कशी मिळाली?, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “काल पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी माझी भेट घेतली. मुंबईमधील काही मशिदींना परवानगी दिल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी मला दिली.”

“मुंबईमध्ये बहुतांश मशीदी या अनधिकृत आहेत. त्या मशिदींवरील भोंगे देखील अनधिकृत आहेत. या मशिदींना परवानगी मिळतेच कशी?”, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याना परवानगी देण्यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले.

“आमच्या सणांवेळी भोंग्यांना फक्त एका दिवसाची परवानगी मिळते, मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवसांची परवानगी कशी मिळाली?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. आज मुंबईत ९२ टक्के मशिदींवरील भोंग्यांवरून पहाटेची अजाण झाली नाही”, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, “मुंबईत आज मोठ्या प्रमाणावर मशिदींवरील भोंग्यांवरून पहाटेची अजाण झाली नाही. पण मुंबईतील १३५ मशिदींवर भोंग्यांवरून पहाटे ५ ची अजाण झाली. या मशिदींवर राज्य सरकार कारवाई करणार का?”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
नांदा सौख्यभरे! अखेर विराजस-शिवानीचा विवाहसोहळा संपन्न, पहा लग्नातील खास फोटो
…तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, राज ठाकरे फुकले रणशिंग, भोंगा प्रकरण चिघळणार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते प्राजक्ता माळीला मिळाला ‘हा’ पुरस्कार; पोस्ट शेअर करत म्हणाली,…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now