लग्नाच्या आधीच ‘हे’ टीव्ही सेलिब्रीटी झाले आई-बाबा, आता केलंय लग्न, पहा लग्नाचे खास फोटो

टीव्ही सेलेब्स ‘पूजा बॅनर्जी’ आणि ‘कुणाल वर्मा’ यांनी त्यांच्या मुलाच्या जन्माच्या एका वर्षानंतर पुन्हा एकदा धूमधडाक्यात लग्न केले. पूजा आणि कुणालने गोव्यात आपले कुटुंब आणि खास मित्रांच्या उपस्थितीत रीती-रीवाजानुसार लग्न केले, ज्याचे खास फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.

पूजा बॅनर्जीने तिच्या इन्स्टाग्रामवर पती कुणाल वर्मासोबतचा एक अतिशय क्यूट फोटो शेअर करून तिच्या लग्नाची माहिती दिली आहे. फोटोमध्ये कुणाल त्याच्या प्रेमळ पत्नीच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. दोघेही गुलाबी आणि पांढर्‍या फुलांचे हार घालून एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

फोटोमध्ये पूजा गुलाबी रंगाच्या साडीत तर कुणाल गुलाबी कुर्त्यामध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना पूजाने लिहिले- ‘न्यूली मॅरीड अगेन’. त्याचवेळी कुणालनेही सेम फोटोसोबत कॅप्शन लिहिले – ‘बन गई मेरी राणी.’ आता या फोटोवर कमेंट करून टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्स दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत आणि दोघांसाठी प्रार्थना करत आहेत.

पूजा बॅनर्जी तिच्या हळदीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या साडीत दिसली होती, ज्यामध्ये लाल बॉर्डर होती. पूजा बॅनर्जी तिच्या लूकमध्ये अतिशय साधी आणि गोड दिसत होती. या जोडप्याच्या लग्नात होणार्‍या सर्व फंक्शन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत.

 

पूजाची मैत्रिण मोनालिसा हिने पूजाच्या हळदी समारंभाचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये अभिनेत्री हळदीमध्ये भिजलेली आणि कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी कुणालच्या मित्राने त्याच्या हळदी समारंभाचा व्हिडिओ शेअर केला.

पूजा आणि कुणालने फेब्रुवारी २०२० मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. पण पारंपारिक विवाह करण्याचे स्वप्न दोघांचे नेहमीच होते, जे वर्षभरानंतर पूर्ण झाले. कोरोना व्हायरसमुळे पूजा-कुणालने त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. पण लग्नानंतर पूजा एका मुलाची आई झाली.

 

पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांनी ९ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांचा मुलगा कृशिवचे स्वागत केले. कृशिव वडील कुणालसोबत घोडीवर बसायला तयार आहे. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी पूजा बॅनर्जीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘सेव्ह द डेट’ या नोटसह तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.