मधूचंद्राच्या रात्री नवरी म्हणाली पोट दुखतंय अन् त्यानंतर घडला धक्कादायकप्रकार

मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यांपासून लग्नाच्या नावावर सतत फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहे. आता अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. ज्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

मध्य प्रदेशमध्ये एक नवरी मधूचंद्राच्या रात्रीच घरातून पळून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या भिण्ड कोतवाली परीसरातील बैसागपुर येथे घडली आहे. पोट दुखत असल्याचे कारण देत नवरी फरार झाली आहे.

मनोज सोनी नावाच्या तरुणाने ३५ हजार रुपये देऊन एक मुलगी खरेदी केली होती. त्यानंतर त्याने घरातच तिच्यासोबत लग्न केले होते. पण तिने मधूचंद्राच्या रात्रीच घरातून धूम ठोकली आहे. आता त्याने मुगली खरेदी करुन आणली होती, त्यामुळे त्याला पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही करता येत नाहीये.

मनोजच्या भावांचे लग्न झालेले होते. त्यामुळे त्यालाही लग्न करण्याची इच्छा झाली. त्यामुळे एका व्यक्तीच्या मदतीने त्याने ३५ हजार रुपये देऊन मुलगी खरेदी केली आणि ४ मे रोजी घरच्यांच्या उपस्थितीतच घरात लग्न केले.

मधूचंद्राच्या रात्री जेव्हा मनोज रुममध्ये आला तेव्हा नवरी म्हणाली माझ्या पोटात दुखत आहे. मनोज म्हणाला थोडं चक्कर मार म्हणजे बरं वाटेल. काहीवेळाने नवरी म्हणाली, अजूनही पोट दुखत आहे, औषध घेऊन या. तेव्हा मनोज बाहेर जाऊन औषध घेऊन आला असता, त्याने पाहिले की नवरी पळून गेली आहे.

मनोजने त्या मुलीला खरेदी करुन आले होते, त्यामुळे आता त्याला पोलिसात तक्रारही दाखल करता येत नाहीये. अशात त्याला अजूनही आशा आहे, की त्याची पत्नी पळून गेलेली नाही. ती लवकरच परत येईल.

महत्वाच्या बातम्या-

गरम पाणी पिल्याने कोरोनापासून कोणताही बचाव होत नाही; मोदी सरकारचं स्पष्टीकरण
भारतात का झाला कोरोनाचा उद्रेक? WHO च्या टॉपच्या सायंटिस्टने सांगितली ‘ही’ कारणे
कपड्यांची बचत तर तुझ्याकडून शिकावी; इवलेसे बोल्ड ड्रेस घालणाऱ्या रश्मी देसाईला सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.