जगातील अशी एक जागा ज्या ठिकाणी महिला आपले अंतर्वस्त्रे सोडून जातात

कधी कोणती जागा कशासाठी प्रसिद्ध होईल हे कधीच कोणाला सांगता येत नाही. कुठले स्थळ पर्यटकांसाठी प्रेक्षणीय तर कुठले स्थळ भाविकांसाठी धार्मिक बनून जाईल हेही कोणीच सांगू शकत नाही.

मात्र आज आपण एका अशा आगळ्या-वेगळ्या जागेची गोष्ट पाहणार आहोत, की ती जागा खास पर्यटक महिलांची अंतर्वस्त्रे अडकवण्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे.

वरचे वाक्य ऐकल्या नंतर तुम्ही ही थोडं अवाक झाला असाल, मात्र हो हे सत्य आहे! न्‍यूजीलँड मधील सेंट्रल ओटैगो या ठिकाणी पर्यटक महिला आपले अंतर्वस्त्र काढून अडकतात.

आता तुम्ही म्हणत असाल या महिला का बरे आपली अंतर्वस्त्रे इथे अडकवत असतील? तर या मागे ही एक रंजक गोष्ट आहे. चला तर मग पाहुयात काय आहे ती गोष्ट.

न्‍यूजीलँड मधील सेंट्रल ओटैगो येथून काही अंतरावर एक पब आहे. याच सेंट्रल ओटैगोच्या गेटच्या भिंतीवरती १९९९ मध्ये न्यू इअर व नाताळ या सणांच्या दरम्यान या पब मध्ये अधिकच पार्ट्या चालत.

एके दिवशी चार मैत्रिणींनी या पब मध्ये पार्टी केली. त्यांनी त्या पार्टीचा अगदी मनमुराद आनंद घेतला. आणि जेव्हा त्या घरी जायला परत निघाल्या तेव्हा त्यांनी त्या क्षणाची आठवण राहावी म्हणून, त्यांनी सेंट्रल ओटैगोच्या गेटच्या भिंतीवरती ४ ब्रा बांधल्या.

या घटनेपासून हे ठिकाण अधिकच प्रसिद्धीस आले. बघता-बघता या ठिकाणी सन २००० पर्यत ब्रा ची इतकी संख्या वाढली की, येथे अक्षरशः ब्रा चे ढिगारे लागले होते.

पुढे जाऊन ब्रा मुळे प्रसिद्ध झालेल्या या जागेला ब्रार्डोना हे नाव देण्यात आले. सन २००० साली ब्रार्डोना येथे ब्रा चे ढीग लागल्याने, क्रिसलँड लेक्स सरकारने ऑक्टोबर २००० साली जवळपास १५०० हुन अधिक ब्रा इथून हटवल्या होत्या.

मात्र ब्रा साठी ब्रार्डोना हे ठिकाण प्रसिद्धीस आल्याने, अवघ्या काही दिवसांत या ठिकाणी पुन्हा तितक्याच ब्रा जमा झाल्या होत्या.

पब आणि ब्रा मुळे प्रसिद्धीस आलेल्या या ठिकानामुळे आता येथे जवळच अनेक पब उभे राहिले आहेत. त्यामुळे येथे अनेक मुली येतात या पब्समध्ये मनमुराद पार्टी करतात. आणि शेवटी जाताना आपली आठवण म्हणून आपल्या ब्रा ब्रार्डोना या ठिकाणाला बांधून जातता.

या सगळ्यात विशेष बाब म्हणजे, येथील सरकारने देखील या गोष्टीवर कोणत्याच प्रकारचे बंधन लादलेले नाही. त्यामुळे या ठिकाणाला कोणीही भेट देऊ शकते. आणि आपलीही आठवण म्हणून कोणीही येथे ब्रा अडकवू शकते.

तर अशा प्रकारे न्‍यूजीलँड मधील सेंट्रल ओटैगो मधील ब्रार्डोना हे ठिकाण काही दिवसातच महिलांच्या अंतर्वस्त्रासाठी अल्पावधीतच खूप प्रसिद्ध झाले आहे. आजही अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देऊन आपली ब्रा आठवण म्हणून अडकवून जातात.

शेवटी काय तर आठवणी जपण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. आणि ज्या वेळी माणूस काही तरी करतो त्याच वेळी नकळत इतिहास ही घडत असतो.

महत्वाच्या बातम्या
कलेक्टरसाहेब डिसेंबरमध्येच लागले होते तयारीला; आता ना ऑक्सिजनची कमी ना बेडची
शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप
उद्योगपतींसोबत घेतलेल्या बैठकीनंतर आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंच्या ‘या’ गोष्टीचं केलं कौतूक; म्हणाले…
बापाने पेपर टाकून इंजिनीअर केलं, नोकरी मिळाली, साखरपुडाही झाला पण कोरोनाने सगळं हिरावलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.