लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने केला ‘हा’ मोठा कांड, नवरदेवाने घेतली पोलिसांत धाव

लखनऊ। अनेकांच्या आयुष्यातील विस्मरणीय क्षण म्हणजे लग्न. घरात लग्न असेल तर संपूर्ण वातावरण हसून खेळून व मनोरंजनाचे असते. जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळे एकत्र येतात व मज्जा मस्ती करत असतात. त्यामुळे लग्नाचे दिवस हे सर्वांसाठी आनंदाचे असतात.

मात्र जर समजा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी पळून गेली तर? बापरे विचार केला तरी धक्का बसतो. मात्र अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील महोबाच्या भटीपुरा येथे लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवी नवरी दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली आहे. या घटनेमुळे घरात एकच गोंधळ उडाला असून नवरदेवानं पोलीस ठाणं गाठलं आहे. चक्क नवऱ्याने बायकोला अटक करण्याची मागणी केली आहे. नक्की प्रकरण काय पाहुयात.

भटीपुरा येथील रहिवासी असलेल्या शेलेंद्र कुमार असं या नावरदेवाच नाव आहे, शैलेंद्र याने सांगितलं की, त्याची आई आणि मावशी यांच्यात त्याच्या लग्नाची बातचीत सुरू होती. याच दरम्यान बम्हौरीकलां चरखारी गावातील रहिवासी असलेल्या एका युवकानं एक स्थळ असल्याचं सांगत लग्नाची बातचीत सुरू केली.

मुलीकडच्या लोकांची परिस्थिती चांगली नसल्यानं सांगत तुम्हीच लग्नाचा संपूर्ण खर्च करा, असंही त्यानं म्हटलं. यानंतर मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला आणि लगेचच मध्यस्थी करणाऱ्या युवकानं लग्नाच्या खर्चासाठी एक लाख रुपये घेतले. ठरल्याप्रमाणं एका मंदिरात हे लग्न पार पडलं.

मात्र, लग्नानंतर सासरी येताच ही नवरी घरात ठेवलेले दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली. नवरी गायब होताच लग्नाची मध्यस्थी करणाऱ्या युवकाला याबाबतची माहिती दिली गेली आणि पोलिसांनाही याची माहिती दिली.

मात्र, मध्यस्थी करणारा युवक आता घरच्यांना फोनवर धमकी देत आहे. पीडित नवरदेवानं म्हटलं, लोकांना लग्नाचं आमिष देत लूट केली जात आहे. त्यामुळे आता ही धक्कादायक घटना घडल्यानंतर सर्वत्र खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या
काळजी वाढली! महाराष्ट्र या ठिकाणी 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जाणून घ्या सविस्तर
स्मिता पाटीलच्या मृत्यूनंतर तुटलेले राज बब्बर रेखाच्या प्रेमात झाले होते पागल
लग्न झाल्या झाल्या नवरीने नवऱ्यासाठी केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल
मुलाने नोकरी सोडून आईला दोन वर्षे १८ राज्यात ५६००० किलोमीटर फिरवले; तेही स्कूटरवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.