भाईजानसाठी कायपण! सलमानच्या ‘राधे’च्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पीपीई किट घालून रस्त्यावर

मुंबई | देशात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून थैमान घातले आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशात लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्बंधांची घोषणा करत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या राधे चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची उत्सूकता सलमानच्या चाहत्यांना लागली होती. चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेता रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ, अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहेत.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटातील टीम वेगवेगळ्या प्रकारे प्रमोशन करत आहे. लोकांमध्ये जाऊन, रिअॅलिटी शोमध्ये जाऊन, सोशल मिडियाद्वारे चित्रपटाचं प्रमोशन करत असतात. आता सलमानच्या राधे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ड्रामा क्वीन राखी सावंत चक्क पीपीई किट घालून रस्त्यावर उतरली आहे.

पीपीई किट घालून राखीने पुर्णपणे स्वत:ला सुरक्षित केले आहे. रस्त्यावरील लोकांना ती सलमान खानचा राधे चित्रपट बघण्याचं आवाहन करत आहे. तसेच मास्क लावा, काळजी घ्या असं सांगत आहे. यावेळी तिने भाजी खरेदीचाही आनंद लुटला आहे.

राखी म्हणते, मास्क घाला, पीपीई कीट घाला, घरी राहा सुरक्षित राहा. हॉस्पीटलमध्ये जाताना मास्क, पीपीई कीट घालून जावा. देवाकडे प्रार्थना करा की आपल्या कुटूंबाला सुरक्षित ठेवा. सलमान खानचा राधे चित्रपट नक्की बघा. मी पीपीई किट वाटणार आहे. असं राखी सावंत म्हणाली.

पुढे राखीने भाजी खरेदी करतानाचा आनंद लुटला. भाजी खरेदी करताना ती भाजीवाल्यासोबत भाव कमी करतान दिसत आहे. माझ्याकडून भाजीचे जास्त पैसे घ्यायचे नाहीत. असं ती म्हणतं आहे. तसेच ती भाजी घेताना इतरांना भाजी खरेदी करायला या असंही सांगत आहे.

रस्त्यावर फिरत असताना राखीने पोलिसांची भीतीही व्यक्त केली आहे. ती म्हणते माझ्यामूळे गर्दी होत आहे. पोलिसांनी मला पाहिले तर मला लाठीने पोलिस मारतील असं राखीने म्हटलं आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे.

सलमान खान आणि सोहेल खानने केली होती राखी सावंतच्या आईची मदत

काही दिवसांपूर्वी राखी सावंतच्या आईचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले होते . त्यांच्या शरीरातून एक मोठी गाठ काढली गेली. राखीच्या आईच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी उंचलला होता. यानंतर राखीने सलमान खानचे रडत रडत आभार मानले होते.

राखी म्हणाली,  सलमान खानने आम्हाला जगातील सर्वात मोठे कर्करोग डॉक्टर डॉ. संजय शर्मा दिले होते. डॉक्टरांनी माझ्या आईला बरे केले. माझे संपूर्ण आयुष्य सलमान भाई आणि सोहेल भाईंनी घ्यावे, अशी मी प्रार्थना करते, असेही तिने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
आमचा ट्रायो तुटला… ; सहकलाकाराच्या जाण्याने हळहळलेल्या जेठालालने लिहीली भावूक पोस्ट
मोदींमुळेच कोरोनाचा भडका, हिंदू नाराज होऊ नये म्हणुन कुंभमेळा होऊ दिला, बंगालमध्ये रॅली काढल्या
राज्यात अत्यावश्यक प्रवासासाठी आता लागणार ई-पास; असा काढा ई-पास
…आणि २० एकरची शेती पोहोचली ७०० एकरवर, हातातली नोकरी सोडून केली शेती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.