Shivsena : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. खरी शिवसेना कुणाची याचाही अद्याप निर्णय लागलेला नाही. तसेच या दोन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सतत वाद निर्माण होत आहे.
यापैकीच एक म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा. दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. मात्र, यावर्षी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले असून हे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार असल्याचा दावा करत आहे.
तसेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. परंतु, महानगरपालिकेने याबाबत अजून कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेला परवानगी न दिल्यास शिवसेना सरळ कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच महापालिकेने हे प्रकरण आणखी ताणले तर थेट मैदानात उतरून दसरा मेळावा घेण्याची तयारीही शिवसेनेने दाखवली आहे.
तसेच शिंदे गटाने दुसरा पर्याय म्हणून मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानासाठी अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेने पर्याय म्हणून ज्या मैदानाकरिता अर्ज केला होता, ते मैदान आरक्षित असल्याने शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
या सगळ्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत थेट कोर्टात जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता महानगरपालिका दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महानगरपालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कचे मैदान रिकामेच राहणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील दसरा मेळाव्यावर वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “परवानगी कशी देत नाहीत? परवानगी द्यावीच लागेल. सर्व शिवसैनिक मुंबईत येतात. शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतो. ही परंपरा खंडित होणार नाही. बाळासाहेबांनी त्यांच्या वाहनात बसूनच भाषण केले होते. उद्धव ठाकरेसुद्धा अशाच प्रकारे भाषण करतील. कायदा सुव्यवस्था बिघडली तर ईडी सरकार जबाबदार असेल असा इशारा देखील चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
Sanjay rathod : राठोडांना आसमान दाखवण्यासाठी शिवसेनेने खेळला मोठा डाव; पोहरादेवीच्या महंतानाच उतरवणार रिंगणात
Shinde group : एकनाथ शिंदेंचा आता भाजपलाच दे धक्का; तब्बल १०० भाजप पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश
Crime : पोलिसांनी डॉक्टरची गाडी थांबवली, तपासात असे काही सापडले की डॉक्टरची रवाणगी थेट तुरुंगात
BSF : BSF जवानांना बांगलादेश सीमेजवळ खड्ड्यात सापडली ८ पोती; आतमधला ऐवज पाहून सगळेच हादरले