Share

नुपूर शर्मांच्या विरोधात देशभरात मुस्लिम रस्त्यावर; हिंसाचार, जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर देशभरात गदारोळ माजला आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम समाजाकडून निदर्शने होत आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर आणि औरंगाबाद शहरात मुस्लिम समाजाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. (On Muslim streets across the country against Nupur Sharma)

तसेच देशातील दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर जमा झाले होते. प्रयागराजमध्ये आंदोलनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर, बाराबंकी, उन्नाव आणि देवबंद या ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच दगडफेक देखील करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या जमावावर सौम्य लाठीचार्ज केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीतील जामा मशिदीबाहेर देखील मुस्लिम समाजाकडून जोरदार निदर्शने सुरू आहेत. यावेळी मुस्लिम समाजाकडून नुपूर शर्मांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

कर्नाटकमधील बेळगाव शहरामध्ये एका मशिदीजवळ निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. काश्मीरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाकडून निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी नुपूर शर्मा यांच्या विरोधात पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात मुस्लिम समाजाकडून भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी परिसरातील दुकाने जमावाकडून जबरदस्तीने बंद करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. हावडा परिसरात देखील दर्शने करण्यात आली आहेत. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
माझ्यावर गुन्हा दाखल करायचा नाही, ही आमदाराची गाडी आहे; भाजप आमदाराच्या मुलीची पोलिसांना दमदाटी
काँग्रेसची तीन मतं होणार रद्द? एकमेव जागाही धोक्यात आल्याने काँग्रेसला फुटला घाम
हॅन्डसम हंक ऋतिकची बहिण पश्मीना रोशनही आहे प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा हॉट फोटो

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now