‘कपिल शर्मा शो’मध्ये कंगना रानौतने केला धक्कादायक खुलासा; लॉकडाऊन दरम्यान २०० एफआयआर चा सामना करावा लागला..

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. सध्या ती प्रत्येक विषयावर तीच मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. तसेच ती सध्या राजकारणातील विषयांवर देखील टीका करत असल्याचे आपण पाहिले आहेच.

कंगना रानौत शनिवार ११ सप्टेंबर रोजी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिसली. नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘थलाईवी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही अभिनेत्री पोहोचली होती. तिने शोचा होस्ट कपिल शर्मा आणि त्याच्या टीमसोबत एक मजेदार वेळ घालवला.

कंगना राणावत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असल्याने कपिलने तिला अनेक वादाशी संबंधित प्रश्नही विचारले. अभिनेत्रीने प्रत्येक प्रश्नाला हुशारीने उत्तरे दिली.

शोमध्ये कपिलने कंगनाला म्हटले की, वादग्रस्त गोष्टी घेऊन बरेच दिवस चर्चेत काढले. मग त्याने अभिनेत्रीची एक जुनी क्लिप प्ले केली, ज्यात ती म्हणत आहे की जे लोक आपला सर्व वेळ सोशल मीडियावर घालवतात ते रिकामटेकडे (वेल्ले) आहेत.

तसेच तिने असेही म्हटले होते की, मला असे वाटते की सोशल मीडियावर जे सर्व लोक आहेत, ज्यांना कोणतेही काम नाही. तुमच्या ओळखीच्या लोकांशी बोलण्यासाठी तर तुम्हाला वेळ मिळत नाही. ज्यांना आपण ओळखत नाही त्यांच्याशी काय बोलाल? ती पुढे म्हणालेली की हे सर्व लोक ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम वर राहतात आणि त्यांनी स्वतःवर अनेक केसेस देखील केल्या आहेत.

मजेशीर गोष्ट म्हणजे कंगनाला मागील वर्षापासून सोशल मीडियाची लत लागली आहे. ती म्हणते, ‘हे खरे आहे. जेव्हा कोरोना नव्हता, तेव्हा ते खूप व्यस्त होते. जेव्हा कोरोना आला, तेव्हा मी बोर झाले. तिने तिच्या ट्विटर बंदीबद्दल बोलले की ती ६ महिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टिकू शकली नाही. या दरम्यान तिच्या विरोधात दररोज सुमारे २०० एफआयआर नोंदवले गेले.

कपिलने कंगनाला विचारले की तिला कसा मुलगा लग्न कण्यासाठी पाहिजे? यावर अभिनेत्रीने सांगितले की तिला शांत प्रकारची मुले आवडतात, कारण ती स्वतः बोलकी आहे. तसेच ती म्हणते की मला पैसे खर्च करायला आवडते म्हणून तो मुलगा एक कंजूस असावा.

महत्वाच्या बातम्या-

१ रुपयाचे जुने नाणं तुमच्याकडे असेल, तर तुम्ही लखपती झालाच म्हणून समजा, ते कसे, जाणून घ्या..
भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; आता खाजगी कंपन्यांना खरेदी करता येणार रेल्वे
“जेव्हा माझं गाणं प्रदर्शीत होतं, तेव्हा लोकं मला वेगळ्या चश्म्यातून पाहतात”; अमृता फडणवीसांनी व्यक्त केली खंत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.