डोक्यावरचा पदर खाली न पडू देता आजींनी आजोबांसोबत घातला धिंगाणा; पहा धम्माल डान्सचा व्हिडिओ

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण काही व्हिडिओ हे चर्चेचा विषय बनत असतात. सोशल मीडियावर आजोबांच्या डान्सचेही व्हिडिओ बघायला मिळत असतात. आताही असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सध्या एका आजोबा आणि आजींच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या आजी आजोबांचा डान्स तरुण तरुणींनाही लाजवेल असा आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हाला हसूही आवरणार नाही.

सुरुवातीला आजोबा डान्स करत धिंगाणा घालताना दिसून येतात. त्यानंतर आजीही डान्स करायला सुरुवात करतात. ते दोघेही जण एकदम जोशमध्ये डान्स करताना दिसून येत आहे. त्यामुळे हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.

आजी-आजोबा या दोघांचेही वय सत्तरी पार केलेल्याचे दिसून येत आहे. पण त्यांचा डान्स २५-३० वर्षांच्या तरुण-तरुणींसारखा आहे. तरुणांसारखाच जोशात ते दोघेही डान्स करताना दिसून येत आहे.त्यांचा हा डान्स पाहून लोकही हैराण झाले आहे.

सध्या काही लोक आपल्या वयामुळे लोकांसमोर नाचायला लाजत असतात, त्यामुळे ते नाचत नाही. पण आजी बिंधास्तपणे नाचताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ कुठल्यातरी गावातला असून तिथे मागून गावातले लोकही जाताना दिसत आहे. हे दोघेही पिंजरे में पोपट बोले या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. युट्युबवर हा व्हिडिओ २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. अनेकांनी या आजीआजोबांचे कौतूक केले आहे, तर अनेकांना हा डान्स पाहून हसू आवरत नाहीये.

महत्वाच्या बातम्या-

माफी मागा अन्यथा जिथे दिसेल तिथे वंगण फासू; राष्ट्रवादीच्या महिला प्रवीण दरेकरांवर आक्रमक
सोनू सूदच्या ६ मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड; लोकांच्या मदतीला सोनूकडे पैसे आले कुठून?, आयटीचा प्रश्न
मोठी बातमी! ठाकरे सरकारने केला चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त, कोकणाला दिले ३ हजार कोटींचे पॅकेज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.