अलीगढसे मेरा पुराना रिश्ता है! नरेंद्र मोदी पुन्हा एकदा….

सध्या उत्तर प्रदेशातमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. नेत्यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. दौरे वाढत असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उत्तर प्रदेशचा दौरा केला आहे. अलीगढ येथे मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या कोनशीलाचे अनावरण केले.

यावेळी मोदी म्हणाले, एक मुस्लिम व्यक्ती होती. ते दरवर्षी तीन महिन्यांसाठी आपल्या गावी येत होते. ते आमच्याकडे कुलुप विक्री करण्यासाठी यायचे. आमचे चांगले संबंध होते. त्यांची दिवसभरात जी काही कमाई होत होती, ती वडिलांकडे द्यायचे, आणि परत जाताना ते पैसे घ्यायचे, अशी आठवण मोदींनी यावेळी सांगितली.

तसेच ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील सीतापूर अलीगढ ही त्या काळी मोठी शहरे म्हणून ओळखली जायची, त्या ठिकाणी अनेकदा जाणं- येणं होत होते. कुलपांमुळे घराचे संरक्षण होते तर शस्त्रांनी देशाच्या सीमेचं संरक्षण होईल अशा भावना मोदींनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकं उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर निधी देखील त्यांनी दिला आहे. कोरोना असला तरी मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे जात आहे, असेही ते म्हणाले.

तसेच मोदींमुळे भारत जगासमोर आदर्श झाला आहे, गुंतवणूक वाढली आहे. आतापर्यंत १ कोटी ६१ कोटींना रोजगार दिल्याची माहिती योगींनी दिली. योगींनी आपल्या भाषणात मोदींचे अनेकदा कौतुक केले आहे.

दरम्यान भाजपकडून राज्यात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.