…अन् संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकलेल्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यासाठी तो एकटा धावला

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांची मुभा नसलेल्या दुसऱ्या मार्गाने शेतकरी दिल्लीत प्रवेश करत असल्याने दिल्लीत लाल किल्ला परिसरात अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. पोलीस त्या मार्गाने जाऊ देत नसल्याचा दावा शेतकरी करत आहेत.

या दरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे.  व्हिडिओत पोलीस जवान हिंसक शेतकऱ्यांच्या जमावात सापडतो, मात्र एक वृद्ध शेतकरी पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन जात असताना काही इतर आंदोलक गराडा घालतात, मात्र त्यातूनही तो त्यांना सुरक्षितपणे पुढे नेतो. अखेर इतर काही आंदोलकही पोलीस कर्मचाऱ्याला तेथून सुरक्षित नेतात.

दक्षिण दिल्लीमधील आयटीओ परिसरात हा प्रकार घडला आहे. आंदोलक ट्रॅक्टर आणि घोड्यावर स्वार होऊन हातात लाठीकाठी आणि तलवारी घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत सध्या पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. पोलीस आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत.

राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले आहे. ट्विट करुन त्यांनी म्हटले की, “हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचे होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.”

महत्त्वाच्या बातम्या
दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरुच; राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन
आधार कार्ड अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक, खोट्या वेबसाईटपासून राहा सावध अन्यथा…
गृहिणींसाठी कामाची बातमी! धान्याला किड लागू नये यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.