तरुणांनाही लाजवेल असा भन्नाट डान्स करताय आजोबा; पहा आजोबांच्या ठुमक्यांचा व्हिडिओ

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यामध्ये अनेक व्हिडिओ हे प्रचंड व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमुळे कधी कधी अश्रू अनावर येतात, तर काही व्हिडिओंमुळे हसू आवरणे कठीण होऊन जाते. तसेच काही डान्स व्हिडिओ पण व्हायरल होत असतात.

आता असाच एका आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या आजोबांनी इतका भन्नाट डान्स केला आहे की ह डान्स पाहून एखादं तरुणही लाजेल. त्यामुळे या आजोबांचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये एक वयस्कर माणूस डान्स करताना दिसत आहे. या आजोबांचे वय जास्त असले तरी त्यांची डान्स करण्याची स्फुर्ती एखाद्या तरुणापेक्षा कमी नाहीये. या आजोबांनी घेतलेले ठुमके सुद्धा खुप उत्साहवर्धक आहे.

या आजोबांचा डान्स पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी जमली आहे. लोकंही आजोबांचा डान्स आवडीने पाहत आहे. एखाद्या तरुणापेक्षाही भारी डान्स करताना आजोबा दिसून येत आहे.

सोशल मीडियावरही या व्हिडिओला नेटकऱ्यांनी खुप चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडिओला अनेक लोकांनी मजेदार कमेंट केल्या आहे. अनेक लोकांनी आजोबांच्या डान्सचे कौतुकही केले आहे.

हा व्हिडिओ कुठला आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. इन्स्टाग्रामवर hepgul5 इन्स्टग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओ दिड लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे, दोन हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

https://www.instagram.com/reel/CQavpY6D2u5/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या-

मुंबईच्या रुग्णालयाचा भोंगळ कारभार! आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला उंदराने कुरतडले
सावधान! ‘हे’ पदार्थ खात असाल, तर होऊ शकतात तुम्हाला गंभीर आजार; आजच करा बंद
हुंड्यासाठी नवविवाहित पत्नीला शिवीगाळी करत बेदम मारहाण, अखेर तिने उचललं असं पाऊल की…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.