अबब! भारतात ‘या’ ठिकाणी प्रत्येक सेकंदाला तयार होणार १ इलेक्ट्रीक स्कूटर, OLA उभारणार कारखाना

मुंबई | जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. अनेक देशांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राथमिकता दिली आहे. अशात ऑनलाइन कॅब बूकिंग सेवा पुरवणाऱ्या ओलाने(ola) भारतात जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कारखान्याची घोषणा केली आहे.

तमिळनाडुच्या कृष्णागिरी जिल्ह्यात उभारणाऱ्या या कारखान्याला ‘ओला फ्यूचरफॅक्टरी’ असं नाव देण्यात आले आहे. हा कारखाना ५०० एकर जागेत उभा राहणार आहे. विशेष बाब म्हणजे या कारखान्यात दर दोन सेकंदाला एक स्कूटर तयार होणार असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे.

या कारखान्याचा पहिला टप्पा १ जून २०२१ मध्ये सुरू होईल. पहिल्या टप्प्यात वर्षाला २० लाख स्कूटर प्रोडक्शनची क्षमता असेल. याशिवाय कारखान्यात १० प्रोडक्शन लाइन असतील या सर्व लाइनवर पुर्ण क्षमतेने काम चालणार असल्याचे ओलाचे ग्रुप सीईओ अग्रवाल यांनी सांगितले आहे.

हा कारखाना देशातील सर्वात आधुनिक टू-व्हीलर कारखाना ठरणार आहे. याठिकाणी रोबोटसह आधुनिक पद्धतीने काम होणार आहे. तसेच बॅटरीपासून इतर सर्व उपकरणे एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

काही दिवसांपुर्वीच ओला भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता याबाबतचा एक व्हिडीओ कंपनीचे ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कारखान्यात कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्याकडे कंपनीचा कल असणार आहे. याशिवाय कंपनीच्या स्कूटर चागंले मायलेज देणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
टाटा बाजारात आणणार सर्वात स्वस्त SUV कार, वाचा काय आहे किंमत आणि फिचर्स
खरचं जुन ते सोनं! भांडी घासण्यासाठी चुलीतल्या राखेची मागणी वाढली, ऑनलाईन केली जातेय विक्री
सचिनने डॉक्टरांसोबत केले प्रॅंक, डॉक्टर इतके घाबरले की…; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.