गृहीणींंसाठी आनंदाची बातमी! आता खाद्यतेलाच्या किंमती होणार कमी, केंद्राची मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे गृहीणींचे घरातील बजेट कोलमडले आहे. असे असताना आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता खाद्यतेलांच्या किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कारवाई केली आहे.

आता ग्राहक मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवत व्यापाऱ्यांना दर आठवड्याला आपला स्टॉक जाहीर करण्यास सांगितले आहे. खाद्यतेलांच्या आयातीवरील सीमाशुल्क कमी करूनही किमती कमी होत नाहीत. यामुळे आता साठेबाजीवर लक्ष दिले जाणार आहे.

यामुळे साठेबाजीला आळा घालण्यासाठी अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या अंतर्गत प्रक्रिया युनिट्सना त्यांच्या स्टॉकची माहिती सरकारला द्यावी लागेल. राज्य सरकार हे काम करतील आणि त्यांना आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत हा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पाऊस असून सोयाबीनचे चांगले उत्पादन अपेक्षित आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा चांगले होईल. यासह, आंतरराष्ट्रीय बाजारात पाम आणि सोयाबीन तेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत, ज्यामुळे देशातील खाद्यतेलाच्या किमती खाली येतील, असे सांगितले जात होते.

मागील काही महिन्यात खाद्य तेलांच्या किंमती गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमोडून गेले आहे. दरम्यान, आता सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या किमतींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.