खुशखबर! खाद्यतेल दोन दिवसानंतर ५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होणार, वाचा सविस्तर..

नवी दिल्ली । कोरोनामुळे देशात हाहाकार सुरू असून, अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत, आणि त्या पार्श्वभूमीवर खाद्य तेलाच्या किंमती भरपुर प्रमाणात वाढू लागल्या होत्या, नागरिकांना खाद्य तेल घेईचे का नाही हा प्रश्न पडत होता.

मात्र, आता खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागे प्रमुख कारणे म्हणजे, तेल स्वस्त होण्याची कारणे आता समोर येऊ लागली आहेत. यामुळे गेल्या चार दिवसांत खाद्य तेलांच्या किंमतीत १५ टक्के कमी झाली आहे. यापैकी सर्वात मोठ्या कारणावर मंगळवारी अमेरिकेत निर्णय घेतला जाऊ शकतो.

४० ते ५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होण्याची चर्चा होऊ लागली आहे. अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका, मलेशिया आणि इंडोनेशियामधून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात होते. परंतु काही दिवसांपूर्वी अमेरिकेत बायो फ्यूलमध्ये ४६ टक्क्यांपर्यंत रिफाइंड ऑईल मिसळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यापूर्वी ही टक्केवारी १३ इतकी होती. तसेच ईदमुळे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये काम कमी झाल्याने प्रोडक्शनवर याचा परिणाम होतो. काही देशांमध्ये हवामानामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. भारतात तेलाच्या किंमती वाढण्यामागे ही काही प्रमुख करणे आहेत. परंतु मंगळवारी अमेरिकेत पुन्हा एकदा बायो फ्यूलमध्ये, इतर खाद्य तेल किती टक्क्यांपर्यंत मिसळले जावेत, यावार विचार होणार आहे.

यात ४६ टक्केच रिफाइंड ऑईल मिसळण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच आता मलेशिया आणि इंडोनेशियामध्येही प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतीय बाजारात पाहायला मिळू शकतो. स्थानिक तेल व्यापारी लाला गिरधारी लाल गोयल यांनी सांगितले, की यावर्षी मोहरीचे रेकॉर्डब्रेक ८६ लाख टन उत्पादन झाले आहे.

हे उत्पादन गेल्या वर्षीहून अतिशय जास्त आहे. नवीन मोहरीचे उत्पादन होणे हेदेखील तेलाच्या किंमती कमी होण्यामागे एक कारण आहे. खाद्य तेलाच्या कमी किंमती झाल्यावर नागरिकांना मात्र थोडा दिलासा मिळणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

…तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवले यांच्या वक्तव्याने खळबळ

पुण्यात साधी नोकरी करणारा युवक कसा झाला ‘देवमाणूस’; नकारात्मक पात्र असूनही करतोय प्रेक्षकांच्या मनावर राज्य

करीनाच्या जागी ‘सीता मातेची’ भूमिका या अभिनेत्रीला द्या, ट्विट करत नेटकऱ्यांची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.