ओ तेरी! महिलेनं घातलं 264 झूम मिटिंगला एकच शर्ट, पण शेवटच्या दिवशी झालं असं की…

नवी दिल्ली। सध्या जगात कोरोना विषाणूने थैमान घातल्याने अनेक लोक घरातून वर्क फ्रॉम होम काम करत असल्याचे चित्र गेले वर्षभर आपण पाहत आहोत. अशातच ऑफिसची सर्व कामे घरूनच असल्याने कामा निम्मित होणाऱ्या मिटींग्स या देखील घरूनच होत असतात.

त्यामुळे अनेक लोक आॅनलाईन पध्दतीने मिटींग पार पाडत आहेत. अशाच पध्दतीने जेम नावाच्या महिलेनं झूम मिटिंगमध्ये एकच शर्ट तब्बल 264 वेळा घातलं असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तिला 264 एकच शर्ट घातल्याचे कोणीच नोटीस केलं नाही.

30 वर्षीय जेमनं तिच्या फॅशन एक्सप्रिमेंटबद्दल सोशल मीडियावर एक किस्सा शेअर केला आहे. गेल्या 15 महिन्यात तिनं कंपनीच्या प्रत्येक मिटिंगला एकच शर्ट घातलं. ब्लू कलरच हवाईयन शर्ट त्यावर फुल आणि अननसाचं चित्र आहे.

मात्र कंपनीतल्या एकाही कर्मचाऱ्याला माझ्या कपड्याबद्दल समजलं नाही. मात्र कंपनीच्या शेवटच्या दिवशी ही गोष्ट मीच सर्वांना सांगितल अशी ती म्हणाली.

ती सांगताना म्हणाली आहे की, 2018 मध्ये तिनं गॅपमधून हा शर्ट विकत घेतला होता. 2 एप्रिल 2020 रोजी कोरोनाला सुरुवात झाल्यानंतरच्या पहिल्या व्हिडिओ मिटिंगला हा शर्ट घातला. त्यानंतर ती पुन्हा पुन्हा तोच शर्ट घालत राहिली.

प्रत्येक मिटिंगला ती तोच शर्ट घालायची. हा प्रकार एकूण 264 मिटिंगमध्ये चालू राहिला. तिला अपेशा होती की कमीतकमी एका व्यक्तीच्या तरी ही गोष्ट लक्षात यावी. मात्र ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही.

मात्र ज्यावेळी माझ्या कामचा शेवटचा दिवस होता त्यावेळी मी त्या स्व:ता सांगितले की, मी प्रत्येक झूम मिटिंगला एकच शर्ट घातला. तेव्हा त्यांच्या काहीच लक्षात नाही आलं. त्यांना समजलंच नाही की मी नेमकं कशाबद्दल बोलत आहे. एवढे दिवस त्यांच्या लक्षात आले नव्हते, असं जेमनं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या
Indian Idol 12; ट्रोल होत असलेल्या शण्मुखप्रिया बद्दल जावेद अख्तर यांनी केले धक्कदायक विधान, म्हणाले…
VIDEO; ‘तेरे ही सपने अंधेरों में उजालों में…’ पाकिस्तानी तरुणीवर चाहते पुन्हा घायाळ
बाबो! रश्मिकाचा फॅन ९०० किलोमीटर प्रवास करुन आला तिला भेटायला, पण तिथं जाऊन भलतंच घडलं
VIDEO: नितीन गडकरींचा ताफा पुढे जाताच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकारी अन् एसपींमध्ये हाणामारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.