ओ तेरी! कोंबडीचा अंड्यासोबत जबरदस्त स्टंट, एकदा व्हिडिओ पहाच

मुंबई। सोशल मीडियावर दिवसाला अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ हे हैराण करून सोडणारे असतात. तर काही मनोरंजनाचे असतात. अशातच अनेकजण खतरनाक स्टंट करताना दिसत असतात. मात्र त्यात एखादा मानव स्टंट करताना दिसत असतो.

मात्र सध्या एक असा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक कोंबडी चक्क अंड्यासोबत स्टंट करते आहे. व हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. हे स्पष्ट दिसतं आहे. मात्र तरीही हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो, सुरुवातीला कोंबडी आपल्या एका पायावरून दुसऱ्या पायावर अंड उडवते.

मग ते हवेत भिरकावते. आपल्या मानेवर घेते, तिथून आपल्या पंखावर घेते. पुन्हा आपल्या मानेच्या खालील दिशेने भिरकावते आणि तिथून पायापर्यंत आणते.

कोंबडीचा अंड्यासोबतचा हा स्टंट पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तर अनेकांना एडिट केल्याचे सहज समजत आहे. कोंबडीचा हा आगळावेगळा स्टंट अनेकांच्या पसंतीस उताराला आहे. व्हिडिओवर आतापर्यंत अनेक मजेशीर कमेंट आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
VIDEO: पाठकबाईचा राऊडी अंदाज; बुलेटसोबत केले ‘असे’ काही की चाहते झाले हैराण
अभिनेता कार्तिक आर्यन १० दिवसांत झाला कोट्यधीश, जाणून घ्या कशी लागली लॉटरी
बॉयफ्रेंडचे निघाले आणखी तीन मुलींसोबत अफेअर; तरुणीने ‘असा’ घेतला बॉयफ्रेंडशी बदला
आनंदाची बातमी! SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन तुम्ही पण करु शकता हजारोंची कमाई; जाणून घ्या कसे…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.