अरे वाह! अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी बहरला डबल आनंद; झाला जुळ्या बाळांचा बाप

मुंबई। मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या घरी डबल आनंद बहरला आहे. कारण संकर्षण कऱ्हाडे जुळ्या मुलांचा बाप झाला आहे. संकर्षणच्या पत्नीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. व ही आनंदाची बातमी संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावरून फोटो पोस्ट करत दिली आहे.

27 जून रोजी या दोन्ही बाळांचा जन्म झाला आहे. महत्वाचं म्हणजे या दोघांची नावं देखील त्याने फोटोसोबत शेअर केली आहेत. संकर्षणने मुलाचं नाव ‘सर्वज्ञ’ आणि ‘स्रग्वी’ असं ठेवलं आहे.

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, संकर्षण दोन्हीं बाळांकडे बघत आहे व त्याच्या चेहऱ्यावर आनंद बहरल्याचे दिसत आहे. त्याने हा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये देत मुलांची नावं लिहिली आहेत.

चि. सर्वज्ञ (SARVADNYA) संकर्षण कऱ्हाडे आणि कु. स्रग्वी (SRAGVI) संकर्षण कऱ्हाडे अशी नावं लिहीत त्याने या नावांचा अर्थदेखील सांगितला आहे. (सर्वज्ञ : सर्व जाणनारा , ज्ञानी .. स्रग्वी, पवित्रं तुळस..) असं त्याने कॅप्शन देत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

संकर्षणची पत्नी शलाका पांडेने गोंडस बाळांना जन्म दिला आहे. 27 जून रोजी शलाकाने दोन बाळांना जन्म दिला. 1 ऑगस्टला संकर्षणने ही गोड बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर होताच अनेकांनी त्यांच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. व अनेकांनी कमेंट्स करत बाळांना आशीर्वाद दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना! भरलग्नात नवऱ्याने नाही, तर दुसऱ्या तरुणानेच केले नवरीला किस; पहा व्हिडिओ
आपण कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस
प्रसाद लाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संजय राऊंतानी काढली 3 शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत
आयुष्याची नव्याने सुरुवात करणार मंदिरा बेदी; पतीच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.