व्हॉट्सअँपच्या मदतीने आता लोकांना पँन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्ससह इतर कागदपत्रे डॉऊनलोड करता येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने मोठा दिलासा देणारी माहिती लोकांना सांगितली आहे. लोकांना अडचणीच्या वेळीही या सुविधेचा वापर करता येणार आहे.
मंत्रालयाने सांगितले आहे की, डिजीलॉकर सेवेचा वापर करण्यासााठी WhatsApp वरील MyGov हेल्प डेक्समध्ये प्रवेश करू शकतील. लोकांचे डिजीलॉकर खाते तयार करून प्रमाणीकरण करणे, पँन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, वाहन नोंदनी प्रमाणपत्र, यासारखी कागदपत्रे डाऊनलोड करणे अशा सर्व सुविधा व्हॉट्सअँपवर दिल्या जाणार आहेत.
WhatsApp वर MyGov हेल्पडेक्सची सुविधा हे लोकांच्या सोयीच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. MyGov हेल्पडेक्स डिजीलॉकर सेवेद्वारे लोकांना घरबसल्या अनेक सुविधा पुरवणार आहे. हेल्पडेक्स द्वारे लोकांना घरबसल्या आवश्यक असलेली कागदपत्रे डाऊनलोड करता येतील.
पँन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, सीबीएससी इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, वाहन नोंदनी प्रमाणपत्र, दहावीची मार्कशीट, बारावीची मार्कशीट, विमा पॉलिसी इत्यादी कागदपत्रे आपण MyGov हेल्पडेक्समध्ये ठेऊ शकतो. जाणून घ्या व्हॉट्सअँपवरील फिचरचे फायदे.
देशभरातील वापरकर्ते WhatsApp क्रमांक +91 9013151515 वर हाय किंवा हँलो किंवा डिजीलॉकर संदेश पाठवून चँटबॉटचा वापर करू शकतात. डॉक्यूमेंट जे डाऊनलोड करायचे आहे ते, डिजीलॉकरवरूण डाऊनलोड करता येऊ शकते.
WhatsApp वर DigiLocker सारखे MyGov चँटबॉट हे नागरिकांना संसाधने आणि अत्यावअश्यक सेवांमध्ये प्रवेश देण्यासाठी MyGov चँटबॉट आहे. MyGov चँटबॉट ला ८० दशलक्षाहून अधिक लोक जोडले गेले आहेत. कोविडच्या काळात MyGov हेल्पडेक्स लोकांना कोविड विषयी माहिती देत होते.
महत्वांच्या बातम्या:-
देश हादरला! व्हिडीओ बनवण्याच्या बहाण्याने बोलावलं आणि मित्रांनीच केला गायिकेचा खून
मालवणातील तारकर्ली बीचवर मृत्यूचे तांडव; २० पर्यटकांनी भरलेली बोट भर समुद्रात बुडाली
जेव्हा मिमिक्रीमुळे वादात सापडली होती सुगंधा मिश्रा, कंगनाने दिली होती थेट ‘ही’ धमकी, वाचा किस्सा